केंद्रीय अर्थसंकल्प हा गोंधळलेला अर्थसंकल्प : जयंत पाटील

टीम महाराष्ट्र देशा : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. त्यांनी ट्वीट करून देशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प हा ‘गोंधळलेला अर्थसंकल्प’ वाटतो. नक्की कोणत्या क्षेत्राला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे याची स्पष्टता त्यात नाही. खरं तर आधीच असलेल्या शेतीशी संबंधित योजनांना भरीव निधी देणे या अर्थसंकल्पातून अपेक्षित होते. अस ट्वीट केले आहे.

Loading...

तसेच त्यांनी पुढे ‘या महागाईबद्दलचे महिलांच्या वेदना समजून घेऊन महागाई कमी करण्यासाठी काहीतरी करतील असे अपेक्षित होते. मात्र महागाई कमी करण्यासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही’ असही पाटील म्हणाले आहेत. युवा वर्गालाही नाराज करणारा हा अर्थसंकल्प आहे. देशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंपन्या बंद पडत आहेत, त्यावरही कोणताच उपाय या अर्थसंकल्पात केलेला नाही. कालच्या आर्थिक पाहणीत देखील गोलमाल वाटत आहे.

किमान अर्थसंकल्पात तरी देशाच्या विकासाच्या इंजिनाला भरीव गती देणारे निर्णय घेतले जातील असे अपेक्षित होते, मात्र तसे काहीही झालेले नाही. उलट या अर्थसंकल्पाने नैसर्गिक विकास प्रक्रियेला खीळ बसेल.अर्थमंत्र्यांनी लोकानूनयी निर्णय घ्यायचे नसतात, उलट देशाची अर्थव्यवस्था सुदृढ राहण्यासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजना करायच्या असतात मात्र निर्मला सीतारमण यांना हे माहितीच नाही असे दिसते.

दरम्यान, काळा पैसा भारतात परत आणण्याची वल्गना करणाऱ्या या सरकारने बजेट मध्ये या विषयाचा नामोल्लेख सुद्धा केलेला नाही. असही पाटील म्हणाले आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील