“हा” पठ्ठया सगळ्या विषयात ३५ मार्क मिळवत झालाय थाटात पास!

हिंगोली: दहावीचा निकाल म्हणजे आयुष्यात विशेष महत्व असलेला पहिला निकाल असतो. अनेक जण जीव लाऊन, रात्रंदिवस एक करत, वेगवेगळे क्लास लाऊन या परीक्षेला सामोरे जातात. खरं तर बरोबर आहे, कारण या परिक्षेवर ठरतं कि पुढच्या शिक्षणासाठी तुम्ही कुठं प्रवेश घेणार. इतकंच काय ते महत्व! कमी गुण पडले म्हणजे भविष्य अंधारमय होतं असं अजिबात नाही.

दरवर्षी जेवढं कौतुक ९० च्या पार जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं होत, तेवढंच कौतुक ३५% मिळवत पास झालेल्या विद्यार्थ्यांचं पण होतंच!  अनिकेत शिवाजी रनविर याला देखील सगळ्याच विषयात ३५ गुण मिळाले आहेत. अनिकेत हा कौडगाव ता. वसमत जि. हिंगोली मध्ये राहणारा आहे. तो मिळालेल्या मार्कांनी खुश असून पुढे ITI करण्याची त्याची ईच्छा आहे. गावापासून लांब रानात घर, थोडीच पण किमान भूक भागेल इतक्या शेतीत काम करणे, लांब असलेल्या शाळेत जाणे अशा अनेक संकटांवर मात करत त्याने दहावी पास केली असून, पुढे शिक्षण काय घ्यायचं याची कल्पना देखील त्याने करून ठेवली होती.

दरम्यान, गावच्या पोराने केलेला हा पराक्रम देखील गाजत असून गावभर याचीच चर्चा सुरु आहे. तर, आज तब्बल नेहमीपेक्षा दोन महिने उशीरा निकाल लागला असून कोरोना महामारीच्या संकटामुळे पेपर तपासणीला वेळ लागला होता. राज्याचा एकूण निकाल हा ९५.३० टक्के इतका लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. तर, एकूण ९ विभागांमध्ये कोकण विभाग प्रथम तर औरंगाबाद शेवट आहे.

दूध उत्पादक पुन्हा आक्रमक; उद्या १ ऑगस्ट रोजी करणार राज्यव्यापी आंदोलन

आता, शालेय आणि उच्च शिक्षण या दोन्ही शिक्षण प्रकारांना शाखांच्या चौकटीतून बाहेर काढून आंतरशाखीय आणि समन्वयी करण्यात आले आहे. एकाचवेळी अभियांत्रिकी व संगीत हे दोन्ही विषय घेऊनही उच्च शिक्षण पूर्ण करता येणार आहे. शालेय शिक्षणाची रचना आता १० + २ ऐवजी ५ +३ +३ +४ अशी झाली आहे. पहिली तीन वर्षे पूर्वप्राथमिक, त्यानंतर दोन वर्षे पहिली व दुसरी, पुढील तीन वर्षे तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवी आणि अखेरची ४ वर्षे नववी ते बारावी अशा १५ वर्षांंमध्ये शालेय शिक्षण विभागण्यात आले आहे. त्यामुळे दहावी, बारावीच्या बोर्डच रद्द करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच कुशल भविष्य निर्माण होण्यास मदत होणार आहे.

महत्वाची बातमी: अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी