टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल (IPL) ही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. आयपीएल लीग मधील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा सर्वात यशस्वी संघ आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद आपल्या नावावर केले आहे. अशात आईपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स मधील एक स्टार खेळाडू परत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला होता. पण आता तो लवकर बरा होत असून, तो खेळामध्ये पुनरागमन करू शकतो.
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये या खेळाडूचे होऊ शकते पुनरागमन
इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे खेळापासून लांब होता. पण नुकत्याच मिळालेल्या रिपोर्टनुसार, जोफ्रा आर्चर आता वेगाने बरा होत आहे. दरम्यान क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, तो पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन संघामध्ये पुनरागमन करू शकतो. सध्या तो इंग्लंड लायन संघासोबत संयुक्त अरब अमिरतीमध्ये असून त्याचे पुनर्वसन सुरू आहे. त्यामध्ये तो उत्कृष्ट प्रगती करत आहे. 2023 च्या सुरुवातीच्या काळात त्याला पुन्हा स्पर्धा खेळायला मिळू शकते.
गेल्या वर्षी झालेल्या मेगा आयपीएल लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने इंग्लंडच्या या घातक गोलंदाजाला तब्बल आठ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. तेव्हा तो फारसा फिट नव्हता तरी मुंबई इंडियन्स ने त्याला आपल्या संघामध्ये ठेवले होते. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सने आयपीएल 2023 मध्ये देखील जोफ्रा आर्चरला सोडले नाही. कारण त्याने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने स्वतःला नेहमी सिद्ध केले आहे.
मुंबई इंडियन्समध्ये आधीपासूनच सर्वोत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराह उपस्थित आहे. अशात जोफ्रा आर्चर त्याचा गोलंदाज साथीदार बनणार आहे. जोफ्रा आर्चरने आयपीएलमध्ये 35 सामन्यात 46 विकेट घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी…”; संजय राऊतांचा रणजीत सावरकरांवर निशाणा
- Narayan Rane | नीलम गोऱ्हे यांच्याबाबत नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…
- Maharashtra Winter Update | राज्यात सर्वत्र पसरली गुलाबी थंडी, तर काही ठिकाणी मोसमातील निचांकी तापमानाची नोंद
- Sushma Andhare | “रावसाहेब दानवे आमचा गोरापान भाऊ, तर भुमरे…”, सुषमा अंधारे बरसल्या
- Congress | रणजीत सावरकर यांनी पंडित नेहरुंवर केलेल्या आरोपांवर काँग्रेस नेत्याचा पलटवार, म्हणाले…