बसवराज मुरुमकर यांची हँट्रीक रोखण्यासाठी भाजपकडून ‘हा’ नेता मैदानात

लातूर : माजी राज्यमंञी बसवराज पाटील मुरुमकर यांची औसा मतदारसंघातून ‘आमदारकी’ची हँट्रीक रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले खासगी स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना भाजप-शिवसेना यूतीकडून औसा विधानसभा निवडणूकीच्या फडात उतरविण्याची जोरदार शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. बसवराज पाटील हे सन २००९ पासून औसा मतदारसंघाचे आमदार आहेत.

त्यांना या मतदारसंघाच्या विविध समस्या व प्रश्नांची जाण असून मतदारसंघाचा त्यांना चांगला अभ्यास आहे. मागील दोन टर्मपासून ते मतदारसंघाच्या सातत्याने संपर्कात असून मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्यात त्यांना यश आले आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमी ते कामाला लागले असून आगामी निवडणूकीत विजय संपादन करुन ते आपल्या विजयाची हँटट्रीक करण्याच्या तयारीत आहेत.

Loading...

दरम्यान, पाटील यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार देवून त्यांची आमदारकीची हँटट्रीक रोखण्याची खेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून खेळली जाणार असल्याची चर्चा भाजपा गोटातून ऐकावयास येत आहे. बसवराज पाटील यांच्या विरोधात यूतीकडून तगडा उमेदवार दिल्यास या मतदारसंघात परिवर्तन होवून पाटील यांना मोठा शह बसू शकतो हे राजकीय गणित घालून आगामी निवडणूकीत भाजपकडून अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देण्याचा घाट घातला जात आहे.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस हे अभिमन्यू पवार यांना औसा मतदारसंघाच्या विविध कामासाठी मोठा निधी देवून ताकद देत असल्याचे पाहावयास मिळत आहे.आमदारकी डोळ्यासमोर ठेवून अभिमन्यू पवार हे मागील दोन वर्षापासून या मतदारसंघात कायम तळ ठोकून आहेत.अभिमन्यू पवार यांनी विविध गावच्या रस्त्यासाठी शासकीय निधी मंजूर करुन आणला आहे.

त्याचबरोबर या मतदारसंघातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत.माकणी धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्या-या योजनेसाठी ते मुख्यमंञी यांच्याकडे प्रयत्नशील असल्याचे समजते.पालकमंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निलंगा तालुक्यातील ६८ गावांचा समावेश औसा मतदारसंघात असल्यामुळे निलंगेकर यांची भूमिका अत्यंत मोलाची राहणार आहे.

या मतदारसंघातील भाजपमधील गटबाजी थांबवून शिवसेना पूर्णताकदीने अभिमन्यू पवार यांच्या पाठीमागे राहिल्यास आगामी विधानसभा निवडणूकीत राजकीय चमत्कार घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमधून ऐकावयास येत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?