fbpx

महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या ‘त्या’ नेत्याचे निलंबन

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपा नेत्याचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. अनिल सौमित्र असे भाजप नेत्याचे नाव आहे. गांधी राष्ट्रपिता तर होते पण पाकिस्तानचे. भारतात तर त्यांच्यासारखे करोडो पुत्र जन्माला आले. काही लायक होते तर काही नालायक होते. अशा आशयाची फेसबुक पोस्ट त्यांनी केली होती.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी नथुराम गोडसे देशभक्त होते. असे वक्तव्य केले होते. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. इतकेच नव्हे तर, भाजपनेही त्यांच्या वक्तव्याशी पक्षाचा काही संबंध नसल्याचे म्हंटले होते. याचदरम्यान भाजपचे नेते अनिल सौमित्र यांनी गांधी राष्ट्रपिता तर होते पण पाकिस्तानचे. भारतात तर त्यांच्यासारखे करोडो पुत्र जन्माला आले. काही लायक होते तर काही नालायक होते. अशी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्यांच्या वक्तव्यावर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी दाखल घेतली आहे. इतकेच नव्हे तर, साध्वी प्रज्ञासिंह, केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे आणि अनिल सौमित्र यांना पक्षाच्या अनुशासन समितीनं नोटीस पाठवत १० दिवसामध्ये उत्तर देण्यास सांगितले होते. पण, आता भाजपनं अनिल सौमित्र यांचं निलंबन केलं आहे