टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2023 (IPL 2023) मिनी ऑक्शनपूर्वी (Mini Auction) सर्व फ्रेंचाईजींनी आपल्या रिलीज आणि रिटेन खेळाडूंच्या याद्या जाहीर केल्या आहे. यानंतर अनेक संघांमध्ये बरेच बदल दिसून आले आहे. कारण अनेक संघांनी ठराविक खेळाडूंना आपल्या टीममध्ये ठेवले असून काहींना करार मुक्त केले आहे. अशा परिस्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challenges Bangalore) या संघाच्या संचालक माइक हेसन यांनी मोठी माहिती दिली आहे. माईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल 2023 मध्ये आरसीबी (RCB) संघातील अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) पूर्णपणे तंदुरुस्त असून तो संघाचा भाग होणार आहे.
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल टी 20 विश्वचषकानंतर गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर तो इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेतून बाहेर पडला होता. त्याचबरोबर 13 डिसेंबर ते 14 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या बिग बॉश लीगमध्ये देखील मॅक्सवेल खेळू शकणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. दुसरीकडे, आयपीएल पुढच्या वर्षी मार्चच्या आसपास खेळली जाणार आहे. तोपर्यंत त्याच्याकडे पुरेसा वेळ आहे. अशा परिस्थितीत मॅक्सवेल पूर्णपणे तंदुरुस्त होऊन आयपीएल 2023 मध्ये आरसीबी संघाचा भाग असेल असा अंदाज बांधला जात आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये ग्लेन मॅक्सवेलचे पुनरागमन
आयपीएल 2021 पूर्वी ग्लेन मॅक्सवेल हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा प्रमुख सदस्य होता. 2021 च्या आयपीएल मध्ये त्यांनी उत्तम फलंदाजी करत आपली कामगिरी सुद्धा केली होती. त्यानंतर गेल्या आयपीएल हंगामामध्ये फ्रेंचाईजीने त्याला अकरा कोटी रुपयांमध्ये संघात कायम ठेवले होते. मॅक्सवेलने मागच्या आयपीएल मध्ये तेरा सामन्यांमध्ये 301 धावा केल्या होत्या.
दरम्यान, रॉयल चॅलेंजेस बंगलोरने मिनी ऑक्शनपूर्वी आपल्या संघातील अनिईश्वर गौतम, चामा मिलिंद, लवनिथ सिरोदिया आणि शेरफाईन रदरफोर्ड या खेळाडूंना रिलीज केले आहे. दरम्यान, IPL 2023 मध्ये केन विलियम्सन, मयंक अग्रवाल जेसन होल्डर, पॅट कमिंन्स यासारख्या दिग्गज खेळाडूंना आपल्या संघाने रिटेन केले नाही. आयपीएल 2023 मध्ये सर्व संघांनी मिळून एकूण 85 खेळाडूंना आपल्या संघातून सोडले आहे. दरम्यान यावर्षी मिनी ऑक्शन मेगा ऑक्शनच्या स्वरूपात बघायला मिळणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Rahul Gandhi PC | मराठीत प्रश्न विचारा, मराठी समजते – राहुल गांधी
- Uddhav Thackeray | “…अशा मातृसंस्थांच्या पिल्लानी आम्हाला सावरकरांविषयी प्रश्न विचारू नये”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
- ICC Ranks | टी 20 मध्ये पुन्हा भारतीय संघ आघाडीवर, विश्वचषक जिंकून इंग्लंड भारताच्या मागे
- Shinde vs Thackeray | “आधी मातोश्री पवित्र करावी” ; शिंदे गटातील आमदाराचा घणाघात
- Sanjay Raut | “राजकीय स्वार्थासाठी इतर नेत्यांना भारतरत्न दिला, मग…”, संजय राऊतांचा फडणवीसांना खोचक सवाल