Share

KGF | KGF मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या ‘या’ अभिनेत्याने घेतला अखेरचा श्वास

KGF | बेंगलोर: दक्षिणात्य सुपरस्टार यश (Yash) च्या केजीएफ (KGF) आणि केजीएफ चॅप्टर 2 (KGF: Chapter 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. यशबरोबरच या चित्रपटातील प्रत्येक कलाकार चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रत्येक कलाकारांनी या चित्रपटाद्वारे आपलं एक वेगळं स्थान निर्माण केला आहे. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावणारे कृष्णा जी राव (Krishna Ji Rao) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे दक्षिण फिल्म इंडस्ट्रीसोबत चाहत्यांमध्ये देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, कृष्णा जी राव हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. बेंगलोरमध्ये सीता सर्कलजवळील विनायक रुग्णालयामध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्याचबरोबर वयाच्या मानाने त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागले होते. अशा परिस्थितीत उपचारादरम्यान त्यांनी आपले अखेरचे श्वास घेतले. होंबळे फिल्म प्रोडक्शन यांनी ट्विट करून कृष्णा जी राव यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

कृष्णा जी राव गेल्या अनेक वर्षापासून साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक दक्षिण सुपरस्टारसोबत काम केले आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या केजीएफ या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. केजीएफ चित्रपटामध्ये यशसोबत बजावकेल्या भूमिकेनंतर कृष्णा जी यांनी जवळपास 30 चित्रपटात काम केले होते.

केजीएफ मध्ये सुपरस्टार यशसोबत काम केल्यानंतर कृष्णा जी राव यांना विशेष लोकप्रियता मिळाली होती. कारण केजीएफ या चित्रपटातील त्यांचे पात्र रॉकी म्हणजेच यशच्या कथेला वळण देणारे ठरते. केजीएफमध्ये कृष्णा जी अंध व्यक्तीच्या भूमिकेत दिसले होते. कृष्णा जी राव एखाद्या छोट्या भूमिकेत देखील आपल्या दमदार अभिनेत्याने आपली छाप सोडायचे. त्यामुळे त्यांची लोकप्रियता खूप वाढली होती.

महत्वाच्या बातम्या 

KGF | बेंगलोर: दक्षिणात्य सुपरस्टार यश (Yash) च्या केजीएफ (KGF) आणि केजीएफ चॅप्टर 2 (KGF: Chapter 2) या चित्रपटाने बॉक्स …

पुढे वाचा

Entertainment

Join WhatsApp

Join Now