कलम ३७० हटवणे म्हणजे देशाच्या सुरक्षेला धोका : राहुल गांधी

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. जम्मू काश्मीरचे विभाजन करून कलम ३७० हटवण्याच्या विधेयकावर राज्यसभेत शिक्कामोर्तब झाले आहे. आज गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत कलम 370 रद्द करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव मांडताचं विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला आहे. तर ही दडपशाही असल्याचं नारा दिला आहे. यावर कॉंग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी ट्विट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जम्मू-कश्मीरला एकतर्फी विभाजन करून, निवडलेल्या प्रतिनिधींना तुरूंगात टाकून आणि राज्यघटनेचे उल्लंघन करून राष्ट्रीय एकात्मता वाढविली जात नाही. हे राष्ट्र केवळ भूखंड नव्हे तर आपल्या लोकांनी बनलेली भूमी आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. तसेच आज सभागृहात कलम ३७० बाबत चर्चा सुरु आहे. यावर विरोधकांनी प्रखर विरोध दर्शवला आहे. तर जम्मू-काश्मीरसंदर्भात संविधानाचं पालन झालेलं नाही, असे म्हणत कॉंग्रेस नेते सभागृहात आक्रमक झाले आहेत.

दरम्यान आज लोकसभेत 370 कलम हटवण्याबाबत चर्चा सुरु आहे. ही चर्चा सुरु असतना सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार टोलेबाजी होत आहे. देशाच्या वरिष्ठ सभागृहात सोमवारी पहिली प्रक्रिया पार पडली. राज्यसभेत ३७० कलम रद्द करण्याचा प्रस्ताव बहुमताने संमत झाला. हा प्रस्ताव समंत झाल्यानंतर देशातील उच्चभ्रू मंडळींनी सरकारवर नकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने हे कलम काढण्याचे धाडस केले आहे. ते दाखवताना लोकशाही परंपरा आणि पद्धती यांचा आदर झाला असता तर हे धाडस अधिक स्वागतार्ह ठरले असते, अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.