fbpx

नागपुरात थर्टी फर्स्टला दोन खून आणि दोन चाकू हल्यामुळे खळबळ

crime

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर मधे एकीकडे नव वर्षाचे स्वागत होत असतांना दुसरीकडे ३१ डिसेंबरच्या रात्री शहरात वेगवेगळ्या ठिकाणी दोन खून आणि चाकू हल्यांच्या घटना घडल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांची जन्मभूमी असलेलं नागपूरमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढलं आहे. नागपूर मधे सुयोग या शासकीय इमारती जवळ प्रेमलाल देसाई या व्यक्तीचा खून करण्यात आला. तसेच कबीर दुरई या तरुणाचा आशीर्वाद नगरात खून करण्यात आला. या प्रकरणात सुरेश गोटाफोडे या आरोपीला अटक करण्यात आली. गोटाफोडे हा  मृत कबीरचा मानलेला भाऊ होता. सुरेशच्या वडिलांनी त्याला लहानपणापासून मुलाप्रमाणे सांभाळ केला होता. वारंवार कबीर मुळे आपला अपमान होत असल्याचा  राग मनात ठेवत सुरेशने कबीरचा खून केला.

तसेच शहराच्या वर्धा रोड परिसरांत एका व्यक्तीवर चाकू हल्ला करण्यात आला ही व्यक्ती जखमी आहे. तर दुसरा चाकू हल्ला आज सकाळी झाला आहे. नागपूर मधे दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.