महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट! “…तर ८० हजार मृत्यू”, अतिरिक्त मुख्य सचिवांचा खुलासा

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला (Maharashtra Third Wave) सुरुवात झाली आहे. ओमायक्रॉनच्या (Omicron) संसर्गाने महाराष्ट्रात ८० हजार जणांना प्राण गमवावे लागण्याची शंका राज्याचे आरोग्य डॉ. सचिव प्रदीप व्यास (Dr. Pradip Vyas) यांनी व्यक्त केली आहे. नव्या वर्षात जानेवारीच्या तीसऱ्या हप्त्यात महाराष्ट्रात पॉझिटीव्ह रुग्ण संख्या दोन लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. राज्यात कोरोनाच्या तीसऱ्या लाटेत ८० लाख कोरोना रुग्ण आढळून आल्यास त्यातील एक टक्का रुग्णांचा मृत्यू झाल्यास ८० हजार रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. यामुळे हे स्पष्ट आहे की तीसरी लाट सुरु झाली आहे. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास यांनी शुक्रवारी रात्री उशिरा राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात ते म्हणाले, जर राज्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ८० लाख रुग्ण बाधित झाले आणि त्यातील एक टक्का रुग्णांचा मृत्यू झाला तर ८० हजार रुग्ण दगावणार आहे. पुढे डॉ. व्यास म्हणाले, ओमायक्रॉन व्हेरिएंटला हलके घेऊ नका, हा विषाणू ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांच्यासाठी खूप घातक सिद्ध होणार आहे. यामुळे लसीकरणाची संख्या वाढवा, यामुळे आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो.

महाराष्ट्रात मागील चोवीस तासात कोरोनाचे ९ हजार १७० रुग्ण समोर आले आहेत. यातील ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ६६ लाख ८७ हजार ९९१ झाली असून त्यातील १ लाख ४१ हजार ५३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई शहर आता कोरोनाचे हॉट स्पॉट बनले आहे. गत चोवीस तासात मुंबईत ६ हजार ३४७ नवे रुग्ण बाधित झाले आहेत. यासह महाराष्ट्रातील १० मंत्री आणि २० आमदार कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.

महत्वाच्या बातम्या