स्वतंत्र विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या शहरात तृतीयपंथी मैदानात

kinnar nagapur2

नागपूर: लोकसभा २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र विदर्भाची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी तृतीयपंथीयांनी दहा दिवसांचं साखळी उपोषण सुरु केलं आहे. त्यामुळे आता राजकीय नेते सुद्धा मैदानात उतरण्याची चिन्हे आहेत. या उपोषणामुळे सरकारची डोकेदुखी वाढणार आहे. शासनाने स्वतंत्र विदर्भाची मागणी मान्य केली नाही, तर आंदोलन उग्र रुप धारण करेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

विदर्भ राज्य वेगळ झालं तर शेतकऱ्यांचा फायदा होईल, सामान्य नागरिकांचे प्रश्न सुटतील. त्यामुळे अखिल हिंद फॉरवर्ड ब्लॉकच्या बॅनरखाली इतवारीमधल्या विदर्भ चंडिता मंदिर परिसरात या आंदोलनाला सुरुवात झाली असून किन्नर समाजाचे नेता उत्तमबाबा सेनापती आणि त्यांचे अनुयायी आंदोलनात सहभागी झाले आहेत. सरकार हाय हायच्या घोषणा देत आणि खास किन्नर समाजाच्या प्रथेप्रमाणे टाळ्या वाजवत निषेध सुरु आहे.