महाराष्ट्रातील १४ तर देशातील ११७ जागांसाठी आज मतदान, महाराष्ट्रात अटीतटीच्या लढती

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यातील मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे, महाराष्ट्रातील १४ जागांसह देशातील ११७ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे, लोकशाहीच्या उत्सवात देशातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभाग घेत आहेत.

Loading...

भाजप अध्यक्ष अमित शहा, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सपाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांच्यासह डझनभर दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख लढती

बारामती

पवारांचा गड असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्र्वादीकडून सुप्रिया सुळे तर भाजपकडून कांचन कुल यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे, भाजपच्या डझनभर नेत्यांनी बारामतीमध्ये सभा घेत वातावरण तापवले आहे.

सांगली 
सांगलीमध्ये भाजपकडून संजय काका पाटील विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटना विशाल पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये लढत होत आहे.

कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे, शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी त्यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे.. कॉंग्रेसच्या प्रतिक पाटील यांच्या भुमिकेकडे येथे सर्वांचे लक्ष आहे.

हातकणंगले
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आघाडीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत, शेट्टी यांना शिवसेनेच्या धैर्यशील माने यांच्या प्रमुख आव्हान आहे.

माढा

माढा लोकसभा मतदारसंघातील लढाई यंदा चांगलीच रंगली आहे, राष्ट्र्वादीचे संजय शिंदे तर भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांच्यामध्ये येथे लढत होत आहे.

जालना
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहे, दानवे यांना कॉंग्रेसच्या विलास औताडे यांचे आव्हान आहे.

औरंगाबाद
औरंगाबादमध्ये यंदा चौरंगी लढत होते आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून सुभाष झांबड तर वंचित बहुजन आघाडीतर्फे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील. तसेच दानवे यांचे जावई आमदार हर्षवर्धन जाधव अपक्ष म्हणून रिंगणात आहेत,

अहमदनगर
अहमदनगरमध्ये कॉंग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपवाशी झालेले सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या आ संग्राम जगताप यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील याची प्रतिष्ठा येथे पणाला लागली आहेLoading…


Loading…

Loading...