एक नव्हे तर पवारांचे दोन नातू एकाच वेळी राजकारणात उतरण्याची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा- राष्ट्रवादी काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष, खासदार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तिसऱ्या पिढीतील दोन युवक राजकारण प्रवेशासाठी इच्छुक आहेत. सध्या या दोघांवरच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पार्थ अजित पवार आणि रोहित राजेंद्र पवार हे ते दोन युवक आहेत.

पार्थ हे अजित पवार यांचे चिरंजीव; तर रोहित हे शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब यांचे नातू आहेत. रोहित हे सध्या पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत; तर पार्थ हे उद्योजक आहेत.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही लोकसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार उतरण्याची शक्यता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचं नाव उमेदवारीसाठी पुढे असल्याची सूत्रांची माहिती आहे.

अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन राजकारणात प्रवेश केला होता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा पार्थ मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. पार्थ पवार हे शरद पवारांसोबत अनेक राजकीय कार्यक्रमांमध्ये दिसले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी नागपुरात विधिमंडळाचे कामकाज पाहण्यासाठी हजेरी लावली होती.

तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांचे आणखी एक नातू राजकारणात जम बसविण्याच्या तयारीत आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित राजेंद्र पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांच्या विश्वासू, निकटवर्तीयांनी सांगितले.

शरद पवार नव्हे तर ताबडतोब क्लीनचीट देण्याचे काम देवेंद्र फडणवीस करतात : भुजबळ

 

अहो अजितदादा एवढे मनाला लावून घेऊ नका : राज ठाकरे