तृतीयपंथी व्यक्ती या स्त्री अथवा पुरूष नसतात त्यामुळे त्यांनी साडी नेसू नये

रामदास आठवलेंच्या विधानाने वाद

वेबटीम : आपल्या शेरोशायरीमुळे प्रशिद्ध असणारे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे सध्या आपल्या वेगवेगळ्या विधानांनी वादात सापडत असल्याच दिसत आहे. तृतीयपंथी व्यक्ती या स्त्री अथवा पुरूष नसतात. त्यामुळे त्यांनी साड्या नेसणे सोडून द्यावे, असे वादग्रस्त विधान करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.  

सोमवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलण्याच्या सुरात रामदास आठवले यांनी तृतीयपंथीयांनी साड्या नेसू नयेत असा सल्ला दिला. मात्र, आपली चूक लक्षात आल्यानंतर हा केवळ आपला सल्ला आहे, अशी सारवासारव आठवले यांनी केली आहे.