fbpx

पुणे शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस उपाध्यक्षपदाची धुरा तृतीयपंथी चांदणी गोरेंकडे

third gender Chandni Gore has been elected as the Deputy city president of Pune City nationalist women congress

पुणे: कधीकाळी तृतीयपंथी व्यक्ती आपल्या जवळ आली तरी लोक नाक मुरडत होते. मात्र सध्या आपला देश बदलताना दिसत आहे. त्यामुळेच अनेक तृतीयपंथीय गरुडझेप घेत आहेत. यामध्ये आता पुणे शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसकडून तृतीयपंथीय समाजसेविका चांदणी गोरे यांची शहर उपाध्यक्षपदी नेमणूक करत समाजापुढे नवीन आदर्श निर्माण केला आहे.

चांदणी गोरे या गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवा करत आहेत. गोरे या लहान मुलांना ‘गुड टच बॅड टच’चे शिक्षण देतात. तसेच धनकवडी भागामध्ये महिलांचे संघटन करत त्या बचत गट चालवत आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये देखील चांदणीचा सक्रीय सहभाग राहिलेला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी शहराध्यक्ष खा वंदना चव्हाण यांनी गोरे यांची महिला उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.