fbpx

उदयनराजेंंच्या विरोधात निवडणूक लढवणार तृतीयपंथी उमेदवार !

udayan-raje

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उदयनराजे भोसले रिंगणात आहेत तर त्यांच्या विरुद्ध एक तृतीयपंथी निवडणूक लढवणार आहे. प्रशांत वारकर असं या तृतीयपंथी उमेदवाराचे नाव असून हा तृतीयपंथी अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे.

सध्या तृतीयपंथी लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या प्रमाणावर सहभागी होताना दिसत आहेत. यावेळी आपण निवडणूक ही उदयनराजेंच्या विरोधात नाही तर व्यवस्थेविरोधात लढवत असल्याचं वारकर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, एकीकडे प्रशांत वारकर हे निवडणूक लढवत असून दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच ज्या मान्यवरांची मदत घेतली आहे त्या मान्यवरांमध्ये तृतीयपंथी गौरी सावंत यांचीसुद्धा निवडणूक ॲम्बेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१४ साली तृतीयपंथी मतदारांना प्रथम मतदानाचा अधिकार मिळाला. आणि तेव्हापासूनच तृतीयपंथी अशा स्वतंत्र वर्गवारीत या समूहाची नोंद करण्यात येऊ लागली.