Share

Diwali 2022 | दिवाळी साजरी करण्यासाठी कुठे जायचा विचार करताय?, जाणून घ्या राजस्थानमधील ‘या’ ठिकाणाबाबत

टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या सगळीकडे दिवाळीची चाहूल लागली आहे. दिवाळी हा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भारतासोबतच दिवाळी जगभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. देशातील प्रत्येक राज्य दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. त्याचप्रकारे देशातील एका राज्यात दिवाळीला विशेष प्रकारे साजरी केली जाते. जसे महाराष्ट्र मध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.  गुजरात मध्ये नवरात्र उत्साहात साजरी केली जाते. त्याचप्रमाणे राजस्थान हे राज्य दिवाळी सणासाठी ओळखले जाते. राजस्थानमध्ये सगळीकडे दिवाळीची शाही धमाल तुम्हाला बघायला मिळेल. राजस्थानमध्ये दिवाळी साजरी करणे हा एक प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असेल. राजस्थानमध्ये अशी काही ठिकाणी आहे जिथे दिवाळीचा अप्रतिम नजारा आणि भव्य सोहळे आयोजित केले जातात. याच ठिकाणांबद्दल आज आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून सांगणार आहोत.

राजस्थान मध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी आकर्षक ठिकाणी

जयपूर

भारतातील पिंक सिटी म्हणून ओळखले जाणारे जयपूर शहर दिवाळीमध्ये वेगळ्याच प्रकारचे दिसते. दिवाळी दरम्यान हे शहर एखाद्या शाही राजवाडा सारखे चमकते. राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर शहरामध्ये दिवाळीनिमित्त अनेक आकर्षक गोष्टी बघायला मिळतील. दिवाळीनिमित्त राजस्थानातील हवा महल दिव्यांनी उजळून जातो. दिवाळीनिमित्त सजवलेला हा हवा महल प्रत्येकासाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो.

पुष्कर

पुष्कर शहर हे राजस्थानातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पुष्कर शहरामध्ये अनेक धार्मिक स्थळे आहे. त्याबरोबर पुष्कर येथील दिवाळी जगभरात प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या दिवशी पुष्कर शहरातील तलावांचा नजारा पाहण्यासारखा असतो. या शहरांमध्ये पाच दिवस दिवाळीनिमित्त भव्य उत्सव देखील साजरा केला जातो. त्याचबरोबर या उत्सवात उंटांचा मेळावा ही भरवला जातो.

जैसलमेर

राजस्थानातील जैसलमेर शहरात शाही थाटामध्ये दिवाळी साजरी केली जाते. दिवाळी सणानिमित्त जैसलमेर येथील किल्ला अतिशय सुंदर रित्या सजवण्यात येतो. त्याचबरोबर शहरांमध्ये दिवाळीनिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे लोक पारंपारिक कपड्यांमध्ये येथे कार्यक्रम साजरे करतात. त्यामुळे या सणाच्या सौंदर्यात अधिकच भर पडते.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या सगळीकडे दिवाळीची चाहूल लागली आहे. दिवाळी हा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. भारतासोबतच …

पुढे वाचा

Diwali Artical Travel

Join WhatsApp

Join Now