जय शहा यांच्यानंतर आता अजित डोभाल यांच्या पुत्राच्या कंपनीची चर्चा

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पुत्राच्या कंपनीची उलाढाल एका वर्षात सोळा हजार कोटी रुपयांनी वाढल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. हे वृत्त ‘दी वायर’ या वेबसाइटने दिले होते. आता अमित शहा यांच्या पुत्रानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचे चिरंजीव शौर्य डोभाल चर्चेत आले आहेत. याचं कारण म्हणजे शौर्य डोभाल हे कार्यकारी संचालक असलेल्या कंपनीचा गेल्या काही वर्षातील चढता आलेख.

Loading...

इंडिया फाउंडेशन या संस्थेची गेल्या काही वर्षांतील प्रगती नजरेत येण्यासारखी आहे. सरकारशी ‘डिल’ करणाऱ्या कार्पोरेट कंपन्यांकडून या संस्थेला अर्थ पुरवठा होत आहे. यात शौर्य डोभाल कार्यकारी संचालक असलेल्या कंपनीचाही समावेश आहे. ‘दी वायर’ या वेबसाइटने या बाबतचे विशेष वृत्त प्रसिद्ध करून सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. यापूर्वी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांच्या कंपनीची उलाढाल एका वर्षात सोळा हजार कोटी रुपयांनी वाढल्याचे वृत्तही दी वायरनेच दिले होते. यावरून जय शहा यांनी दी वायर विरोधात १०० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा दाखल केला आहे.

शौर्य डोवल आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव राम माधव चालवत असलेल्या या इंडिया फाउंडेशनच्या संचालकांमध्ये संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण, वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, तसेच जयंत सिन्हा आणि एमजे अकबर या मंत्र्यांचाही समावेश असल्याचे दी वायरने म्हटले आहे.Loading…


Loading…

Loading...