‘एकदा तरी विचार’, सिद्धार्थ चांदेकरने शेअर केली एक खास पोस्ट

सिद्धार्थ चांदेकर

मुंबई :  अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. त्याचा चाहता वर्ग देखील खूप आहे. नुकतेच त्याने मिताली मयेकर सोबत लग्नगाठ बांधली. सध्या सिद्धार्थ आणि मिताली सोशल मिडीयावर चांगलेच सक्रीय असतात. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. नुकतेच सिद्धार्थने मानसिक आरोग्य आणि स्वतः कडे लक्ष देण्याबाबत एक पोस्ट शेअर करत सांगितले आहे.

सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, तुला काय हवय? असे विचारल्यावर काय उत्तर येत? कोणाचा आवाज ऐकू येतो? तुझाच की त्यांचा? त्यांच्या इच्छा, अपेक्षा, गरजा आरडा ओरड करू लागतात…,’ अशा आशयाची मोठी पोस्ट सिद्धार्थने शेअर केली आहे. या पोस्ट खाली ‘एकदा तरी विचार करा’ असे कॅप्शन त्याने दिले आहे. अनेकांना या धकाधकीच्या जीवनात स्वत: कडे अधिक लक्ष देण्यास सांगितले आहे.

सध्याच्या या जीवनात अनेकाना मानसिक त्रास अधिक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या विचारातूनच अनेकजण स्वतः कडे पूर्णत: दुर्लक्ष करतात. दुसऱ्यासाठी जगता जगता मात्र स्वतः साठी जगणचं राहून जात. असचं काहीस या पोस्टमधून सिद्धार्थने सांगण्याचा आपुलकीचा प्रयत्न केला आहे. सध्या त्याच्या या पोस्टवर अनेक प्रतिकिया येत असून अनेकांनी त्याच्या लिखाणाचे कौतुक केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP