‘बाटल्यांपेक्षा राज्याच्या हिताचा थोडा तरी विचार करा’ भाजपची टीका

‘बाटल्यांपेक्षा राज्याच्या हिताचा थोडा तरी विचार करा’ भाजपची टीका

uma khapre

मुंबई : राज्याचा कारभार जिथून चालवला जातो, त्या मंत्रालयात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस हे एक रुम आहे. तिथे हे धक्कादायक चित्र आढळून आले.

यावर विरोधी पक्षांकडून सरकारला धारेवर धरले जात आहे. भाजपने दोषींवर कारवीची मागणी केली आहे. तसेच आता भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी मुंबईत महिलेला पटवण्याच्या घटनेचा आधार घेत. महिला सुरक्षेची मागणी केली.

त्या म्हणाल्या, आजचीच घटना, नाशिकमध्ये रिक्षाचालकाने एका महिलेला घरात घुसून मारहाण करुन पेटवले, तर मुंबईतील कांदिवलीमध्ये पुजेच्या नावाखाली एका महिलेला बोलवुन भोंदुबाबाने बलात्कार केलायं. सरकार महाराष्ट्रात महिलांना सुरक्षा मिळणार कि नाही? आता तरी जागे व्हा, महिलांच्या सुरक्षेसाठी काहीतरी करा, बाटल्यांपेक्षा राज्याच्या हिताचा थोडा तरी विचार करा. असे त्या म्हणल्या.

महत्त्वाच्या बातम्या