रिंगरोडबाबत पर्यायी मार्गाचा विचार करू – श्रावण हर्डीकर

pcmc-main

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका शहराचा विकास आराखडा सुधारित करत आहे. आराखडा सुधारित करताना रिंगरोडबाबत पर्यायी मार्गाचा विचार होऊ शकेल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले. त्यामुळे रिंगरोडबाधित नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने स्थानिक नगरसेवकांसोबत आयुक्तांची भेट घेतली. घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील, शिवाजी इबितदार, राजेंद्र चिंचवडे, रेखा भोळे, रजनी पाटील, वैशाली कदम, नगरसेवक नामदेव ढाके, नगरसेविका करुणा चिंचवडे, सामाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे शिष्टमंडळात सहभागी झाले होते.

यावेळी आयुक्त हर्डीकर यांनी रिंगरोडबाबत पर्यायी मार्गाचा विचार होऊ शकेल, असे शिष्टमंडळाला सांगितले. गेल्या सहा महिन्यांपासून घर बचाव संघर्ष समिती विविध माध्यमातून आंदोलन करीत आहे. शहरातील उपनगरातून जात असलेला प्रस्तावित एचसीएमटीआर 30 मीटर रिंगरोड मुळे दाट लोकवस्ती असलेल्या गुरुद्वारा परिसर,चिंचवडेनगर, बिजलीनगर, थेरगाव, पिंपळे गुरव, कासारवाडी परिसरातील 3500 घरे बाधित होत आहेत. या विषयासाठी तातडीने पावले उचलण्यासंदर्भात समितीच्या शिष्टमंडळानी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत चर्चा केली. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, दाट लोकवस्ती असणा-या रहिवासी भागात अंतर्गत 9 मीटर रस्ते करणेही आवश्यक आहेत. त्यामुळे राहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. नागरिकांनीही अंतर्गत रस्त्यांसाठी स्वयंस्फूर्तीने रुंदीकरणासाठी सहकार्य केल्यास अनेक घरे तुटण्यापासून वाचू शकतील.

2 Comments

Click here to post a comment