औरंगाबादेत चोरट्यांचा सुळसुळाट! मुख्य बाजारपेठेत महिलेची पर्स लांबवली

Theft

औरंगाबाद : शहरात सध्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले आहे. पोलिसांकडून अनेक उपाययोजना करून देखील चोरटे हात मारण्यात यशस्वी होत आहे. आठवड्याभरातच १५ पेक्षा जास्त चोरीच्या घटना घडल्या असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी माग्रिक करत आहे.

सणाच्या निमित्ताने बाजारात हेात असलेल्या गर्दीचा फायदा उचलुन एका महिलेच्या बॅगेतून दागिन्यांचे पर्स चोरून नेल्याची घटना सिटीचौक भागात घडली. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ५.३० वाजेच्या दरम्यान महिलेच्या बॅगेतून पिंपरीकर सराफ दुकान ते गुलमंडी सुपारी हनुमान मंदिराच्याजवळ ही चोरी करण्यात आली आहे.

दरम्यान, बॅगेत २० हजार ४८८ रूपये किंमतीचे सोन्याचे फॅन्सी टॉप्स, २० हजार रूपये रोख रक्कम असा एकुण ४० हजार ६८८ रूपयांचा मुद्देमाल चोरण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अंमलदार प्रधान या करित आहेत.

महत्वाच्या बातम्या