चोराच्या उलट्या बोंबा! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने शेरेबाजी केल्याचा टिम पेनने केला आरोप

मुंबई : या वर्षाची सुरुवात भारतीय संघासाठी फारच चांगली ठरली. भारताने ३२ वर्षानंतर गाबा कसोटीत विजय मिळवुन ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात चारीमुड्यां चित केले. या दौऱ्यात भारतीय संघातील अनेक खेळाडू दुखापतीमुळे खेळु शकले नाही. मात्र कर्णधार अजिंक्य रहाणेने चलाखीने नेतृत्व करत भारताला अशक्यप्राय विजय मिळवुन दिला.

मात्र ही मालिका संपल्यांनंतर काही महिन्यानी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने भारतीय खेळाडूवर टिका केली आहे. तो म्हणाला की,’भारतीय खेळाडूकडे प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचे लक्ष विचलीत करण्याचे चांगले कसब आहे. त्याच्या या जाळ्यात फसल्यामुळे आमचे सामन्यावरुन दुर्लक्ष झाले आणि आमचा पराभव झाला. ‘ असे टिम पेन म्हणाला. यावेळी तो म्हणाला की भारतीय खेळाडू शेरेबाजी करुन तुमचे लक्ष विचलीत करतात. असा गंभीर आरोप लावला आहे.

ही मालिका भारतीय संघाच्या कामगीरीपेक्षा ऑस्ट्रेलिया संघाच्या शेरेबाजीमुळे जास्त गाजली होती. तिसऱ्या कसोटी सामन्यात टिम पेनने यष्टीमागुन भारतीय खेळाडू आर आश्विनला शेरेबाजी करत होता. त्याला बाद करण्यासाठी तो शेरेबाजी करत होता. मात्र टिम पेनच्या या वक्तव्यानंतर भारतीय क्रिकेट रसिकांनी याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणले आहे. ऑस्ट्रेलियाच्या गाबा स्टेडियमवर टीम इंडियाने २-१ ने ऐतिहासिक विजय मिळवला होता. तर ऑस्ट्रेलियाचा पराभव झाल्यानंतर ती जखम कायम राहिली.

महत्वाच्या बातम्या

IMP