जनआशीर्वाद यात्रेत चोरांचा धुमाकूळ; दोघे अटकेत

आदित्य ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. परंतु या यात्रेत चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे. गर्दीचा फायदा घेत चोरांनी अनेक पदाधिकाऱ्यांचे मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केल्याचं समोर आलं आहे.

जनआशीर्वाद यात्रा नाशिकमध्ये असताना गर्दीचा फायदा घेत चोर आपल्या खिशातिल पैसे चोरत असल्याचे नगरसेवक दिलीप दातीर यांच्या लक्षात आले. पैसे चोरत असतानाचं दातीर यांनी चोराला रंगे हात पकडून अंबड़ पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना समोर आल्यानंतर आणखीन चार ते पाच जणांचे मोबाईल आणि रोख रक्कम गेल्याचं समोर आलं. मात्र त्यातील फक्त रामदास आहिरे या पदाधिकाऱ्याने २६ हजार रुपये चोरी केल्याची तक्रार दिली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.

दरम्यान, या प्रकरणी दोघांना अंबड़ पोलिसांनी अटक केली आहे. यातील बिलाल खान मालेगावचा असून एक विठ्ठल जाधव हा बीडचा आहे. आज दुपारी त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.