fbpx

चोरट्यांना अच्छे दिन, ‘चौकीदार’ नसल्याने आघाडीच्या रॅली मध्ये चोरांचा सुळसुळाट

टीम महाराष्ट्र देशा : देशाला या सरकारच्या काळात अच्छे दिन आलेत की नाही माहित नाही पण येत्या निवडणुकीच्या प्रचार काळात चोरांना मात्र अच्छे दिन आले आहेत. कारण मोठ मोठ्या नेत्यांच्या प्रचार रॅली मध्ये चोर आपले खिसे भरून घेताना दिसत आहेत.

मंगळवारी साताऱ्याचे आघाडीचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भव्य रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी या भव्य रॅली मध्ये चोरांनी उपस्थित असलेल्या नागरिकांचे खिस्से कापले असून तब्बल ५० तोळे सोने लंपास केले आहे. त्यामुळे उदयनराजे यांची दहशत असणाऱ्या साताऱ्यात चोरांनी देखील चांगलीच दहशत निर्माण केली आहे.

उदयनराजे भोसले यांच्या रॅलीत चोरट्यांनी सुमारे 50 तोळे सोन्याची चोरी केली आहे. तर अनेकांचे मोबाईल आणि पाकिटं मारल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. याप्रकरणी 20 जणांनी पोलीस ठाण्यात तक्रारी देखील दाखल केल्या आहेत. त्यामुळे उदयनराजे समर्थकांना ही प्रचार रॅली चांगलीच महागात पडली आहे.

नगर दक्षिण मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या संग्राम जगताप यांच्या देखील प्रचार रॅली मध्ये चोरट्यांनी हात साफ केला आहे.त्यामुळे आता नागरिकांनी कोणत्याही नेत्याच्या प्रचार रॅली मध्ये सहभागी होताना सावधगिरी बाळगावी अन्यथा निवडणुकी नंतर माराव्या लागणाऱ्या बोंबा आधीच माराव्या लागतील.