मुलींच्या लग्नाचे वय १८ वर्षं केल्यापासून त्या पळून जाऊ लागल्या- भाजप आमदार

gopal parmar

भोपाळ: भाजप नेत्यांचे वादग्रस्त विधानाचे सत्र सुरूच आहे. मध्य प्रदेशातील भाजप आमदाराने लव्ह जिहाद रोखण्यासाठी बालविवाह करण्याचा अजब सल्ला दिला आहे. भोपाळ येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

भाजप आमदार गोपाल परमार म्हणाले, पूर्वी घरचे लहानपणीच मुलींचे लग्न करायचे, त्यामुळे असे लव्ह जिहादसारखे प्रकार होत नव्हते. मात्र, आता मुलींच्या लग्नाचे वय १८ वर्षं केल्यापासून त्या पळून जाऊ लागल्या आहेत”, ज्या मुलींची लग्न होत नाहीत, त्या हमखास लव्ह जिहादला बळी पडतात’ असे वादग्रस्त विधान देखील त्यांनी केली आहे.

पालकांनी मुलींची लग्न कमी वयातच लावून देण्याचा अजब सल्ला गोपाल परमार यांनी दिला आहे. जेव्हा लहानपणीच लग्न ठरवले जात होते तेव्हा मुले चुकीचा निर्णय घेत नसत. त्यांना माहिती असायचे की त्यांचे लग्न ठरले आहे. पण आता तसे होत नाही. जर वेळेत लग्न झाले नाही तर मुली लव्ह जिहादला बळी पडतील, असे गोपाल परमार यांनी