शिवसेनेला मी एकदा हरवल आहे हे त्यांनी विसरू नये : आठवले

मुंबई : दक्षिण मुंबई मतदार संघातून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीला मी इच्छुक आहे. भाजपा-शिवसेना युती झाली तर ही जागा शिवसेनेने माझ्यासाठी सोडावी अशी माझी इच्छा आहे. शिवसेनेने माझ्या विरोधात उमेदवार उभा केला तर याधीही मी शिवसेनेला हरवले आहे, त्यांनी विसरू नये, असं केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी म्हटलं आहे . ते मुंबईत येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

भाजप-शिवसेना गेल्या ३० वर्षांपासून एकत्र आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युती व्हावी ही आमची इच्छा आहे. मी मंत्रिपदा घेण्यासाठी भाजपकडे गेलो नाही, त्यांनीच मला जवळ केले आहे. कॉंग्रेसचा पराभव करण्यासाठी मी भाजपसोबत गेलो. भाजपा आणि शिवसेना एकत्र आले नाही तरीही आरपीआय भाजपासोबतच राहणार आहे. त्याचबरोबर राज्यात अजूनही आरपीआयला मंत्रिपद मिळालेले नाही, दिलेले आश्वासन त्यांनी पूर्ण करावे असेही यावेळी आठवले म्हणले.

लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आठवलेंनी दक्षिण मुंबईतून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भविष्यात भाजप-सेना युती झाली तर ही जागा शिवसेना आठवले यांना सोडणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

You might also like
Comments
Loading...