fbpx

…त्यांना फक्त फाशीच झाली पाहिजे;पिडीतेच्या आईची मागणी

अहमदनगर: कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीच झाली पाहिजे ही माझी आणि संपूर्ण समाजाची मागणी आहे व ज्या पद्धतीने माझ्या छकुलीला यांनी मारून टाकल त्यापाध्तीने या नराधमांना फाशीच झाली पाहिजे. त्याचबरोबर त्या गावात अजूनही आमच्यात भीतीचे तसेच दहशतीचे वातावरण आहे अशी प्रतिक्रिया पिडीतेच्या आईने दिली आहे.

आज कोपर्डी बलात्काराच्या विषयावर अखेरचा युक्तिवाद अहमदनगर जिल्हा सत्र न्यायलयात पूर्ण झाला आहे परंतु या विषयाचा निकाल २९ नोव्हेबर रोजी लागणार आहे. आरोपींना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात केली आहे. पिडीतेच्या आईने देखील फाशीच झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया युकिवाद संपल्यानंतर दिली आहे.त्यामुळे येत्या २९ नोव्हेबर रोजी कोणता निर्णय येतोय ही पाहणं महत्वाच आहे.

ऐका कोपर्डीच्या निर्भयाच्या आईची आर्त हाक