ते ओरडतच राहिले आणि आम्ही निवडून आलो : चंद्रकांत पाटील

हा प्रकार म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे सारखच

टीम महाराष्ट्र देशा : शुक्रवारी सांगली आणि जळगाव महापालिका निवडणूकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. या महापालिकेच्या निवडणुकीत जनतेने दोन्ही कॉंग्रेसला स्पष्ट नाकारत भाजपला कौल दिला. तरीदेखील आता कॉंग्रेस ईव्हीएमवर शंका घेत आहे. हा प्रकार म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे सारखच आहे अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील टोला लगावला. या दोन्ही महानगरपालिकेत भाजपलाच स्पष्ट बहुमत आहे. यापार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील हे सांगलीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सरकारने बळाचा वापर केला, पैसे वाटण्यात आम्ही कमी पडलो, ईव्हीएममध्ये घोळ आहे असे आरोप आता हस्यास्पद वाटू लागले आहेत असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. मागील चार वर्षात लोकसभेची पोटनिवडणूक असो वा नगरपालिकेची भाजप हरणार असा कांगावा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस नेहमी करत आली. मात्र ते ओरडतच राहिले आणि आम्ही निवडून आलो असा टोला ही यावेळी त्यांनी लगावला.

इतकेच नाही तर इतर पक्षातल्या लोकांचे भाजपात येत आहे असा प्रश्न विचारला असता, चांगली माणसे जोडणे हे उत्तम संघटकाचे कौशल्य आहे असे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले. सगळीकडे भाजपाविरोधी वातावरण आहे असा आभास निर्माण करण्यात आला. पण जनता आमच्या सोबत आहे. सरकार आपले काम वेगळ्या पद्धतीने करते आहे. भाजपावर लोकांचा अजूनही विश्वास आहे. असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

‘भाजप लागलंय लुटायला पीएमपीएल काढलीय विकायला’

You might also like
Comments
Loading...