fbpx

तीन वर्षाचा हिशोब मागणाऱ्यांनी त्यांच्या तीन पिढ्यांनी काय केल ते सांगाव; अमित शहा

amit shaha

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेसचे नेते आमच्याकडे तीन वर्षाचा हिशोब मागतात. मात्र त्यांच्या तीन पिढ्यांनी देशासाठी काय केल, असा सवाल करत भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधीवर टीका केली आहे. गांधी घराण्याचा गड मनाला जाणाऱ्या अमेठीमध्ये आज अमित शहा यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. अमेठी हे गांधी घराण्याचे कुरुक्षेत्र आहे, मात्र कॉंग्रेसने अमेठीच्या विकासाकडे दुर्लक्ष केले असून येथील विकास झाला नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

सध्या गुजरात दौऱ्यावर असणारे राहुल गांधी यांनी मोदी-शहांच्या सत्तेत गुजरातचा विकास झाला नसल्याची टीका केली आहे. या टीकेला उत्तर देताना शहा यांनी ‘राहुल गांधी हे अनेक वर्षांपासून येथील खासदार आहेत. मग अमेठीत अजून जिल्हाधिकारी कार्यालय तसेच क्षय रोगावर उपचार रूग्णालय तसेच आकाशवाणीचा एफ एम रेडिओ का आला नाही असा सवाल केला आहे. तर राहुल यांना अमेठी नाही तर कायम इटली आठवते असा खोचक टीमन शहा यांनी लगावला आहे.