‘ते’ गृहमंत्री ईडीला वेडे समजले; राज ठाकरेंचा अनिल देशमुखांना टोला

‘ते’ गृहमंत्री ईडीला वेडे समजले; राज ठाकरेंचा अनिल देशमुखांना टोला

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ते नाशिक दौऱ्यावर आहेत. यानिमित्त राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील ईडी कारवाईबाबतही राज ठाकरेंनी भाष्य केले. ‘ते’ माजी गृहमंत्री ईडीला ‘वेडे’ समजलेत बहुदा, असं म्हणत राज ठाकरेंनी उपरोधिक टोला लगावला आहे.

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप केला. त्यानंतर देशमुखांच्या मागे ईडी, सीबीआय आणि प्राप्तीकरण विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्या मालमत्तेवर अनेकदा धाड टाकण्यात आली आहे. तसेच अनेकदा नोटीस बजावून देखील ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यावरूनच आता राज ठाकरेंनी टीका केली आहे.

‘सरकारच्या कोरोनाच्या लाटा थांबतच नाहीत. टोलवरुन आम्ही आंदोलनं केली, अनेक टोल बंद झाले. सरकार आणि विरोधक येतात तेव्हा त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. राज्यात महिला अत्याचारांच्या घटना वाढत आहेत. त्यासाठी शरीयत सारखा कायदा आणायला पाहिजे. त्याशिवाय हे सुधारणार नाहीत. कोणाला कुठल्या गोष्टीची भीतीच उरली नाही. माजी गृहमंत्र्यांना चौकशीसाठी ईडी बोलावते. ते जात नाहीत. ते ईडीला येडे समजले बहुदा. ज्या ठिकाणी सरकारी यंत्रणांना दुय्यम समजले जाते, तिथे अशा घटना घडणारच, अशी टीका ठाकरेंनी केली.

महत्त्वाच्या बातम्या