ते रेकॉर्डिंग जाहीर करा, आगीत तेल ओतू नका ; पवारांनी चंद्रकांत पाटलांना झापले

चंद्रकांत पाटील, शरद पवार

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षण आंदोलन राज्यभर पेटलं आहे. यावरून मोठ्या प्रमाणात राजकारण सुद्धा सुरु झाल आहे. मराठा आंदोलन पेटवणा-या नेत्यांचं संभाषण आमच्या हाती आहे. वेळ आल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी केलं होत. एबीपी माझाच्या मुलाखतीत मराठा आंदोलनातील हिंसाचारावर त्यांनी भाष्य केलं होत. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येणारी विधाने ही आगीत तेल ओतणारी आहेत. सरकारकडे असलेले रेकॉर्डिंग त्यांनी जाहीर करावे, अस म्हणत शरद पवारांनी चंद्रकांत पाटलांना झापले आहे.

तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला. पण कोर्टात तो निर्णय रद्द झाला, तोपर्यंत आचारसंहिता लागली. त्यानंतर, भाजपचे सरकार आले. या सरकारनेही धनगर व मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे अभिवचन दिले होते. ते आपले वचन पूर्ण करतील असे वाटत होते. पण तरुणांना काहीही न मिळाल्यामुळेच हे आंदोलन पेटल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. कोल्हापूर येथे एका कार्यक्रमात शरद पवार यांनी हे वक्तव्य केल आहे.

. . . म्हणून मुंबईत मराठा आंदोलन पेटले

मराठा आंदोलन पेटवणाऱ्या नेत्यांचं संभाषण आमच्या हाती – चंद्रकांत पाटील

जी टोपी घालुन मौलाना आझाद देशासाठी तुरुंगात गेले ती टोपी घालायला मला लाज का वाटेल – शरद पवार