त्यांना गांधी नावाची ‘अँलर्जी’ नव्हे तर ‘भीती’ आहे : कुमार केतकर

टीम महाराष्ट्र देशा : त्यांना गांधी नावाची ‘अँलर्जी’ नव्हे तर ‘भीती’ आहे. त्यामुळे गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त त्यांचा इतका उदो – उदो केला जातोय की उद्या गांधीजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्वीच सदस्यत्व घेतले होते की काय असे वाटू लागेल, असा टोला राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी लगावला.नोईंग गांधीझम ग्लोबल फ्रेंड्स च्या चौथ्या स्नेहसंमेलनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कुमार केतकर बोलत होते.

सध्याच्या काळात महात्मा गांधींचे कौतुक करायचे आणि पंडित नेहरूंवर हल्ला चढवायचा ही धोरणात्मक चौकट रूढ केली जात आहे. गांधींचा आदर करणे भाग आहे. कारण त्यांचे विचार समाजात रूजले आहेत,असेही केतकर म्हणाले.याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, गांधीजींचे पणतू तुषार गांधी आणि संयोजक संकेत मुनोत आदी उपस्थित होते.

Loading...

महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्यामध्येही अनेकदा वैचारिक मतभेद व्हायचे. तरीही गांधीजींनी नेहरूंची विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजशास्त्रातील दूरदृष्टी पाहून त्यांना वारसदार नेमले. त्यामुळे गांधी आणि नेहरूंना वेगळे काढता येणार नसल्याचे सांगून केतकर म्हणाले, नेहरू लोकांना कधी सांगायचे नाहीत. काँग्रेसला मत द्या पण धोके कुणाकडून आहेत.हे पाहून मतदान करा असे ते म्हणायचे.

आपल्यापासून धोका आहे हे ते सांगायचे म्हणून नेहरू परिवारावर हल्ला चढवणे सुरू आहे. त्यामुळेच नेहरूंबददल कितीतरी चुकीच्या गोष्टी पसरविल्या जात आहेत. २०१४ मध्ये मोदी यांनी नियोजन आयोग रद्द करण्याची घोषणा केली. पण हे त्यांना माहिती नाही की हा आयोग केवळ नेहरूंनी नव्हे तर बोस, लोहिया आणि नेहरू यांनी मिळून स्थापन केला होता.तर तुषार गांधी म्हणाले, सध्याच्या काळात सीएए, एनआरसी विरोधात केवळ मेणबत्ती लावून उपयोग नाही. आता क्रांती ची मशाल पेटवावी लागेल. संविधानाचा आत्मा वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल नागरिकांमध्ये असहकाराची चळवळ रुजवावी लागेल.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
रुग्णालयाची अवस्था पाहून तुकाराम मुंढेंचा संताप; जमत नसेल तर घरी जा...
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश