Share

IPL 2023 | ‘या’ दोन भारतीय खेळाडूंना आयपीएल 2023 खेळायची नाही इच्छा

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल (IPL) ही जगातली सर्वात मोठी क्रिकेट लीग मानली जाते. जगातील प्रत्येक खेळाडूचे या लीगमध्ये खेळण्याचे स्वप्न असते. अशाच भारतातील दोन असे खेळाडू आहेत, ज्यांना आयपीएल 2023 मध्ये खेळायचे नाही. आयपीएल मिनी ऑक्शन (Mini Auction) होण्यापूर्वी या दोन खेळाडूंनी आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन खेळाडूंची नावे आहेत चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि हनुमा विहारी (Hanuma Vihari).

इनसाइट स्पोर्ट्स नुसार, हनुमान विहारी आणि चेतेश्वर पुजारा गेल्या वर्षापासून आयपीएलचा एकही सामना खेळलेले नाही. आयपीएल 2022 मध्ये या दोन्ही खेळाडूंना कोणत्याही संघाने विकत घेतले नव्हते. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंनी आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

चेतेश्वर पुजाराने 2014 मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. चेतेश्वर पुजाराने आपल्या आयपीएल कारकिर्दीमध्ये 30 सामन्यांमध्ये 20.52 च्या सरासरीने 390 धावा केल्या आहेत. यादरम्यान पुजाराचा स्ट्राइक रेट 99.75 होता. तर पुजाराला सर्वोत्तम कसोटीपटू पैकी एक खेळाडू मानले जाते.

चेतेश्वर पुजाराप्रमाणेच हनुमान विहारी देखील एक उत्कृष्ट कसोटीपटू आहे. विहारीने 2019 मध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळायला होता. त्याने 24 आयपीएल सामन्यांमध्ये 88.47 च्या स्ट्राइक रेटने 284 धावा केल्या आहेत. दरम्यान. अनेक हंगामात या दोन्ही खेळाडूंना खेळण्याची संधी न मिळाल्यामुळे हे दोन्ही खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडत आहे.

आयपीएल 2023 साठी 23 डिसेंबर 2022 रोजी कोची येथे मिनी लिलाव होणार आहे. ज्या लिलावासाठी तब्बल 991 खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहे. या यादीमध्ये 114 भारतीय खेळाडूंची तर 277 परदेशी खेळाडूंची नावे आहेत.

महत्वाच्या बातम्या 

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएल (IPL) ही जगातली सर्वात मोठी क्रिकेट लीग मानली जाते. …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now