फेब्रुवारीमध्ये खेळल्या जाणाऱ्या १९ वर्षाखालीलं वर्ल्ड कप संघामध्ये अथर्व अकोलेकरची निवड 

टीम महाराष्ट्र देशा : पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कप ची सर्व क्रिकेटच्या चाहत्यांना उस्तुकता लागलेली आहे. या वर्ल्ड कप साठी बीसीसीआय कोणत्या खेळांडूना निवडणार आहे, यांची पण उस्तुकता आहेच. पण त्याआधी जानेवारी आणि फेब्रुवारी २०२० मध्ये वन डे वर्ल्ड कप स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. १९ वर्षाखाली असलेल्या खेळाडूंमध्ये ही स्पर्धा होणार आहे. त्यासाठी बीसीसीआय ने आपला संघ निवडलेला आहे. ही स्पर्धा 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी मध्ये पार पाडणार. १९ वर्षाखाली असलेला वर्ल्ड कप स्पर्धा भारताने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली जिंकलेली आहे.

या संघात मुंबईचा अथर्व अकोलेकर आणि यशस्वी जयस्वाल या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. अथर्व च्या वडिलांचे २०१० मध्ये निधन झाले आहे. त्याचे वडील विनोद अकोलेकर बेस्टमध्ये कंडक्टर होते. वडिलांच्या निधनानंतर अथर्व ने हार मानली नाही. अथर्व ची आई वैदेही अकोलेकर यांनी अथर्वला खेळण्यासाठी खूप प्रोस्ताहित केले. त्यामुळे आज अथर्व ची मेहनत यशाला आली. भारताला १९ वर्षाखाली आशिया चषक स्पर्धेत जेतेपद मिळवून देण्याचा अथर्वचा मोठा हात आहे. यामुळेच त्याचा १9 वर्षाखाली असलेल्या वर्ल्ड कप च्या संघात निवड झाली.

विजय हजारे चषक स्पर्धेत यशस्वी जयस्वाल ने दमदार खेळी केली होती. या चषक स्पर्धेमध्ये मुंबई विरुद्ध झारखंड सामन्यात यशस्वी जैयस्वाल ने द्विशतक केले होते. या वेळी यशस्वी हा द्विशतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला होता. यामुळे यशस्वी ने १९ वर्षाखाली असलेल्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप मधील संघात आपले नाव मिळवले.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...