‘हे गेट फक्त आमिरसाठी खुले आहे’; ग्लॅमरस फोटोवरून फातिमा पुन्हा ट्रोल

फातिमा शेख

मुंबई : आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून स्वत: आमिर खानने घटस्फोटाची माहिती काही दिवसापूर्वी दिली होती. मात्र आता किरण रावसोबत आमिरने घटस्फोट घेतल्यानंतर फातिमाचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. आमिर खान आता फातिमासोबत तिसरं लग्न करणार असे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, एवढेच काय तर  फातिमाला या घटस्फोटासाठी जबाबदार मानलं जात आहे.

नुकतेच फातिमाने शेअर केलेल्या ग्लॅमरस फोटोमूळे तिला पुन्हा एकदा सोशल मिडीयावर ट्रोल करण्यास सरुवात झाली आहे. फातिमाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये फातिमाने निळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे. या फोटोंमध्ये फातिमा बोल्ड अंदाजात दिसत आहे. हे फोटो पाहून काही नेटकरी म्हणाले, “हिला कोणीतरी तुरुंगातून बाहेर काढा”, “एवढ्या सुंदर महिलेला इतका त्रास का देतात.” ‘सगळे गेट हे फक्त आमिरसाठी खुले आहेत.”, “हे फोटो नक्कीच आमिर खानने काढले आहेत.” अश्या एका न अनेक प्रतिक्रिया सोशल मिडीयावर देण्यात आल्या आहे.

काही दिवसांपूर्वी आमिर खानचं नावं अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत जोडलं गेलं होतं. ‘दंगल’ सिनेमात फातिमाने आमिरच्या मुलीची भूमिका साकारली होती. फातिमा आणि आमिर यांनी ठग्स ऑफ हिंदुस्तान आणि दंगल या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं. त्यानंतर फातिमा आणि आमिर यांचे अफेअर असल्याच्या चर्चा होत्या.

महत्त्वाच्या बातम्या

IMP