Share

Travel Guide | स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच खुली झाली आहेत काश्मीर मधली ‘ही’ चार सुंदर ठिकाण

टीम महाराष्ट्र देशा:  हिवाळा (Winter) येताच आपण फिरायला (Travel) जाण्याचे प्लॅन करायला लागतो. कारण हिवाळ्यामध्ये फिरण्यासाठी सर्वात अनुकूल वातावरण असते. तर या हिवाळ्यामध्ये तुम्ही जर काश्मीर (Kashmir) खोऱ्यांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमचा तो प्रवास स्मरणीय होणार आहे. कारण जवळजवळ 70 वर्षानंतर कश्मीर मधील सुंदर आणि आकर्षक चार ठिकाण पर्यटकांसाठी खुली होणार आहेत. त्यामुळे जर या हिवाळ्यामध्ये काश्मीरला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या स्थळांना लवकर बुक करून घ्या. 70 वर्षानंतर सरकार सोनमर्ग, कर्नाह आणि गुरेझ यासारखी सुंदर पर्यटन स्थळे खुली करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे जर तुम्ही ट्रॅव्हल ट्रीप प्लॅन करत असाल तर निवांत क्षण घालवण्यासाठी तुम्ही काश्मीरमधील या ठिकाणांना भेट देऊ शकतात.

जवळ जवळ 70 वर्षानंतर सरकार जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग, कर्नाह आणि गुरेझ ही स्थळे उघडण्याचा विचार करत आहे. दरम्यान, एलओसी (LOC) जवळ असल्यामुळे बांदीपोरा मधील गुरेझ आणि कर्नाह या ठिकाणांना भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी हेलिकॉप्टर सुविधा उपलब्ध असेल. कारण हे ठिकाण पर्यटकांची लोकप्रिय ठिकाण असून हेलिकॉप्टर मधून या ठिकाणी असलेल्या निसर्गसौंदर्याचे नजारे तुम्हाला दुखता येईल.

काश्मीरमध्ये नवीन ठिकाणी पर्यटकांसाठी खुली केल्यानंतर पर्यटन उद्योगाला फायदा होईलच, पण त्याबरोबर तिथल्या स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल. सरकारने पर्यटन क्षेत्र वाढवायच्या उद्दिष्टाने ही पर्यटन स्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी कडक बंदोबस्त देखील करण्यात आले आहे.

जम्मू कश्मीर मधील या ठिकाणी देखील तुम्ही फिरू (Travel) शकता

भारतातील स्वर्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या जम्मू-काश्मीरच्या सुंदर खोरांमध्ये तुम्ही निसर्गसृष्टीचा आनंद घेऊ शकता. यामध्ये तुम्ही प्रामुख्याने श्रीनगर, पहलगाम, गुनमर्ग, सोनमर्ग, गुरेद व्हॅली, पाटणीटॉप, वैष्णोदेवी इत्यादी ठिकाणांना देखील भेट देऊ शकता.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा:  हिवाळा (Winter) येताच आपण फिरायला (Travel) जाण्याचे प्लॅन करायला लागतो. कारण हिवाळ्यामध्ये फिरण्यासाठी सर्वात अनुकूल वातावरण असते. …

पुढे वाचा

Travel

Join WhatsApp

Join Now