fbpx

राज्याच्या प्रशासनात बोगस लोकं कामाला लागलेत- अजित पवार

अजित पवार

मुंबई: विधानसभेत एमपीएससी परीक्षा घोटाळ्यावरून विरोधकांकडून प्रस्ताव दाखल करण्यात आला. घोटाळ्यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षेमध्ये बोगस परीक्षार्थी बसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बोगस परीक्षार्थींच्या माध्यमातून सरकारी सेवा मिळवणाऱ्या १५ सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

अजित पवार म्हणाले, एमपीएससीच्या परिक्षा देणारे राज्यातील अनेक विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. एमपीएससीच्या परीक्षेत डमी उमेदवार बसवले जातात. यामुळे जे पात्र नाहीत ते क्लास वन अधिकारी झाले आहेत. संबंधित महत्वाच्या पदावरील बोगस अधिकाऱ्यांना शोधून यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी. राज्याच्या प्रशासनात हे बोगस लोकं कामाला लागलेत. त्यांना कमी केलं पाहिजे. बोगस परीक्षार्थींमुळे बुद्धीमान मुलांचा कामकाजावरचा विश्वासच उडेल. त्यातून ते नाउमेद होतील आणि असंतोष निर्माण होईल.