Share

Electric Car Update | पुढच्या वर्षी लाँच होऊ शकतात ‘या’ इलेक्ट्रिक कार

टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये सध्या इलेक्ट्रिक (Electric) वाहनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कारण देशात सध्या इलेक्ट्रिक कार (Electric Car) चा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे गेल्या वर्षात अनेक कंपन्यांनी आपली इलेक्ट्रिक मॉडेल्स बाजारात लाँच केले आहे. त्याचबरोबर वाढत्या पेट्रोलच्या किमती बरोबर लोकांना इलेक्ट्रिक कारचा पर्याय जास्त परवडणारा वाटतो. अशा परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षी पुढील तीन इलेक्ट्रिक कार लाँच होण्याची शक्यता आहे.

Tata Tiago EV

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा नेहमी भारतीय बाजारपेठेमध्ये आपल्या नवनवीन कार लाँच करत असते. काही दिवसांपूर्वीच टाटाने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉंच केली आहे. 2023 मध्ये टाटा या नवीन कारची डिलिव्हरी सुरू करणार आहे. ही कार दोन बॅटरी पर्याय उपलब्ध आहे ज्यामध्ये 19.2kWh आणि 24kWh या दोन बॅटरी पॅक पर्यायांचा समावेश होतो. हा बॅटरी पॅक 250km आणि 315km पर्यंत रेंज देऊ शकतो. या कारच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर , या कारच्या छोट्या बॅटरी व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये आहे.

MG Air EV

MG मोटर या वाहन उत्पादक कंपनीने नुकतीच घोषणा केली, की ते देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. कंपनी ही कार MG Air EV या नावाने लाँच करणार आहे. चाचणी दरम्यान, ही कार स्पॉट झाली आहे. तर MG ने ही कार पहिल्यांदा 2020 ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली होती. कंपनी ही कार दोन बॅटरी पर्याय सोबत लाँच करत आहे. या कारच्या किमती आणि फिचर्स बद्दल अद्याप कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Citroen C3 EV

फ्रेंच कंपनी Citroen पुढच्या आपल्या एंट्री-लेव्हल हॅचबॅक कार C3 चे इलेक्ट्रिक व्हेरियंट लाँच करू शकते. या कारच्या पेट्रोल व्हर्जनची सुरुवातीची किंमत 5.88 लाख रुपये एवढी असू शकते. त्याचबरोबर या कारच्या इलेक्ट्रिक व्हेरीयंटची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा कमी असू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी भारतात ही कार पुढच्या वर्षी लाँच करू शकते.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये सध्या इलेक्ट्रिक (Electric) वाहनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कारण देशात सध्या इलेक्ट्रिक कार (Electric Car) चा …

पुढे वाचा

Cars And Bike

Join WhatsApp

Join Now