Share

Car Update | बाजारात 5 लाखांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत ‘या’ कार

टीम महाराष्ट्र देशा: कार (Car) खरेदी (Buy) कारणे हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातले स्वप्न असते. अनेकदा लोकांना किमतीमुळे कार खरीदने खूप कठीण जाते. कारण बाजारामध्ये कारच्या किमती खूप जास्त आहेत. पण तुम्हाला माहित आहे का? जर तुमच्या कारचे बजेट 5 लाखाच्या आत असेल तर तुमच्यासाठी बाजारात 5 लाखाच्या आत देखील सर्वोत्तम कार उपलब्ध आहेत. या कारची किंमत 3 ते 4 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या कार बद्दल माहिती सांगणार आहोत.

मारुती सुझुकी अल्टो K10 (Maruti Alto K10)

मारुतीने आपले Maruti Alto K10 हॅचबॅक अपडेटेड व्हर्जन नुकतेच लाँच केले आहे. ही कार या जनरेशनचे थर्ड मॉडेल आहे. Maruti Alto K10 ची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 3.99 लाख रुपये एवढी आहे.रियर डोअर चाइल्ड लॉक, स्पीड अलर्ट सिस्टीम, ड्युअल एअरबॅग्ज, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, ड्रायव्हरला सीट बेल्ट रिमाइंडर, इमोबिलायझर आणि ABS + EBD इत्यादी फीचर्सही कार बाजारामध्ये उपलब्ध आहे. Maruti Alto K10 ही कार देशातील स्वस्त कार पैकी एक कार आहे.

डॅटसन रेडी-जी (Datsun Redi-G)

डॅटसन रेडी-जी (Datsun Redi-G) या कारची भारतामध्ये एक्स-शोरूम किंमत 3.98 लाख ते 4.96 लाख पर्यंत आहे. ही कार बाजार मध्ये दोन इंजिन पर्यायासोबत उपलब्ध आहे. मध्ये पहिले पेट्रोल इंजिन 0.8L चे आहे जे 53hp मॅक्झिमम पॉवर जनरेट करून 72Nm टार्क जनरेट करते. तर दुसरे पेट्रोल इंजिन 53hp मॅक्झिमम पॉवर आणि 72Nm टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. ही कार बाजारामध्ये 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन या पर्यायासह उपलब्ध आहे.

रेनॉल्ट क्विड (Renault Kwid)

रेनॉल्ट क्विड (Renault Kwid) या रेनॉल्ट कारची भारतामध्ये सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.64 लाख रुपये आहे. या कारमध्ये 799cc 3 सिलेंडर BS6 इंजिन आहे, जे 54PS पॉवर आणि 72Nm टार्क मॅक्झिमम जनरेट करते. ही कार बाजार मध्ये ओव्हरस्पीड अलर्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, इंजिन इमोबिलायझर, ABS+EBD, ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीट बेल्ट रिमाइंडर, रिअर डोअर चाइल्ड लॉक, रिअर पार्किंग इमर्जन्सी रिट्रॅक्टर सीट बेल्ट, ड्रायव्हर एअरबॅग इत्यादी फीचर्स सोबत उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: कार (Car) खरेदी (Buy) कारणे हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातले स्वप्न असते. अनेकदा लोकांना किमतीमुळे कार खरीदने खूप …

पुढे वाचा

Cars And Bike