Share

Bike Update | 1 लाखापेक्षा कमी किमतीत बाजारात उपलब्ध आहेत ‘या’ बाईक

टीम महाराष्ट्र देशा: आजकालच्या धकाधकीच्या आणि तंत्रज्ञानाच्या जीवनात बाईक (Bike) हे एक फक्त साधन राहिलेले नसून प्रत्येक व्यक्तीची गरज बनत चालले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही बाईक घेण्याचा विचार करत असता पण अनेक वेळा बजेटमुळे तुम्ही तो विचार, विचारच ठेवतात. पण तुम्हाला माहित आहे का? भारतीय बाजारामध्ये (Market) अनेक अशा बाईक उपलब्ध आहेत ज्या तुम्हाला 1 लाख (1 Lakh) रुपयां किमती (Price) पर्यंत  मिळू शकतात. आज आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला एक लाख रुपये रेंज पर्यंतच्या काही लोकप्रिय बाईक्स बद्दल माहिती सांगणार आहोत.

1 लाख रुपये पर्यंत उपलब्ध असलेल्या बाईक (Bike)

हिरो स्प्लेंडर प्लस

हिरोच्या हिरो स्प्लेंडर प्लस बाईकची एक्स-शोरुम किंमत 71,176 रुपयांपासून सुरू होते. ही बाईक 97.2cc इंजिन इंजेक्शन, आणि पेट्रोल इंजिन सह बाजारात उपलब्ध आहे. हे इंजिन 8.01 PS पॉवर आणि 8.05 टार्क जनरेट करते. हिरो स्प्लेंडर प्लस बाईकमध्ये 5-स्पीड गिअर बॉक्स उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या बाईक मध्ये डबल-क्रॅडल फ्रेम टेलिस्कोपिक फोर्क्स आणि प्रीलोड-अॅडजस्टेबल ट्विन शॉक इत्यादींचा समावेश आहे.

होंडा शाईन 125

देशातील आघाडीची टू-व्हीलर उत्पादक कंपनी होंडाची होंडा शाईन 125 भारतीय बाजारामध्ये 77,338 (एक्स-शोरुम) रुपयांपासून उपलब्ध आहे. होंडा शाईन 125 ही बाईक 124cc सिंगल-सिलेंडर, एअर-कुल्ड, इंधन-इंजेक्टर इंजिनसह उपलब्ध आहे. जे 10.7 PS पॉवर आणि 11Nm टार्क जनरेट करते. ही बाईक 5-स्पीड गेअर बॉक्ससह बाजारात उपलब्ध आहे.

बजाज पल्सर 125

बजाज पल्सर 125 या बाईकची एक्स-शोरुम किंमत 96,181 रुपयांपासून सुरू होते. बजाज पल्सर 125 ही बाईक 124.4cc सिंगल-सिलेंडर एअर-कुल्ड काउंट बॅलन्स इंजिन इलेक्ट्रॉनिक कार्बोरेटरसह उपलब्ध आहे. जे 8500 rpm वर 11.8PS पॉवर आणि 6500 rpm वर 10.8Nm टार्क जनरेट करते. ही बाईक सुद्धा 5-स्पीड गिअरबॉक्स बाजारात उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: आजकालच्या धकाधकीच्या आणि तंत्रज्ञानाच्या जीवनात बाईक (Bike) हे एक फक्त साधन राहिलेले नसून प्रत्येक व्यक्तीची गरज बनत …

पुढे वाचा

Cars And Bike

Join WhatsApp

Join Now