Share

Electric Scooter Launch | यावर्षी लाँच झाल्या आहेत ‘या’ बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर

Electric Scooter Launch | टीम महाराष्ट्र देशा: वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) चा ट्रेंड वाढत चालला आहे. अशा परिस्थतीमध्ये देशात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर सतत आपले नवीन मॉडेल्स लाँच करत आहेत. यामध्ये उत्कृष्ट फीचर्ससह अनेक मॉडेल्स बाजारात उपलब्ध आहेत. काही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारामध्ये लोकप्रिय झाल्या आहेत. यावर्षी पुढील बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर बाजारामध्ये लाँच झाल्या आहेत.

यावर्षी लाँच झाल्या आहेत ‘या’ बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter)

Ola S1

Ola S1 (180km) ही देशातील सर्वोत्तम रेंज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. Ola च्या या स्कूटरचे बाजारात दोन प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये S1 आणि S1 Pro यांचा समावेश आहे. Ola S1 ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जर 180km पर्यंत रेंज देऊ शकते. Ola च्या या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरुम किंमत 85,099 ते 1,20,149 लाख रुपयांपर्यंत आहे.

Ather 450 Gen 3

Ather 450 Gen 3 या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 74Ah/3.7 kW बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे. ही स्कूटर एका चार्जर 146 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. त्याचबरोबर या स्कूटरमध्ये अनेक रायटिंग मोड उपलब्ध आहेत. यामध्ये राईड, स्मार्ट इको, स्मार्ट आणि इको मोडे यांचा समावेश आहे. या स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यास साडेचार तास लागतात.

BMW C 400 GT

BMW ने यावर्षी BMW C 400 GT ही इलेक्ट्रिक स्कूटर शक्तिशाली इंजिनसह लाँच केली आहे. यामध्ये 350cc वॉटर कुल्ड सिंगल-सिलेंडर फोर-स्ट्रोक इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 34hp पॉवर निर्माण करण्यास सक्षम आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 139 किमी प्रति तास आहे. या स्कूटरची एक शोरूम किंमत 9.95 लाख रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या

Electric Scooter Launch | टीम महाराष्ट्र देशा: वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) चा ट्रेंड …

पुढे वाचा

Cars And Bike

Join WhatsApp

Join Now