मोदी आणि ट्रम्प मध्ये या आहेत समान बाबी

मोदी-ट्रम्प भेटीकडे जगाच लक्ष

नवी दिल्ली – भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच अमेरिका दौऱ्यावर आहेत . या भेटीसाठी दोन्ही नेते सकारात्मक उर्जेने भरलेले दिसत आहेत. जागतिक स्थरावर या दोन्ही नेत्यांनी आपल्या याच अंदाजाने विरोधकांना बॅकफूटवर केले आहे . त्यामुळेच अस मानल जात आहे की यामुळेच या दोन जागतिक नेत्यांचे सूर चांगलेच जुळतील .

ह्या आहेत या दोन नेत्यांमधील ५ समान बाबी

१ . स्वपक्षीयांचा विरोध

मोदी

मोदी जेव्हा दिल्ली मध्ये आपले पाय रोवत होते तेव्हा त्यांना स्वतःच्या पक्षातूनच विरोधाचा सामना करावा लागला होता . अस बोलल जात की लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी सारख्या जेष्ठ नेत्यांचा मोदींना विरोध होता.

ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सुधा असच झाल होत .  त्यांना त्यांच्याच पक्षातून मार्को रुबियो, क्रिस क्रिस्टी आणि टेड क्रूज यांचा विरोध होता . शेवटी ट्रम्प टेड क्रूज यांच्याशी लढले आणि रिपब्लिकन पार्टी कडून राष्टाध्यक्ष पदाचे उमेदवार झाले .

जिंकल्यानंतर विरोधकांची स्तुती

मोदी

२०१४ लोकसभा निवडणुका जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची स्तुती केली होती

पंप्रधान पदाचा भार स्वीकारल्यानंतर सर्वात आधी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती .

ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी विजय संपादन केल्यानंतर सर्वात आधी त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलेरी क्लिंटन यांचा उल्लेख केला होता . त्यावेळी ट्रम्प म्हणाले होते “ हिलेरी यांनी मला फोन करून शुभेच्छा दिल्या . परराष्ट्र मंत्री म्हणून देश हिलेरी याचं काम लक्षात ठेवेल .

 

निवडणूक मोहिमेत दोघेही आक्रमक होते .

मोदी

नरेंद्र मोदी यांनी आपली निवडणूक मोहीम मोठ्या आक्रमकतेने सुरु केली होती. मोदींनी “मां-बेटे की सरकार” चा नारा दिला होता . मोदींनी आपल्या प्रचारासाठी सोशल मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया चा जोरदार वापर केला होता .

ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प यांनी सुधा निवडणुकीदरम्यान ‘क्रूक्ड हिलेरी'(कुटिल हिलेरी) चा स्लोगन दिला होता.

  1. दुसऱ्या देशांसोबतचे सबंध

मोदी

नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधीला सार्क देशांच्या नेत्यांना आमंत्रित केले होते . नवाज शरीफ सह ४०१७ देश-विदेशातील पाहुणे सहभागी झाले होते .

ट्रम्प

विजयानंतर ट्रम्प म्हणाले होते – कोणता देश किंवा कोणत्या व्यक्तीशी दुष्मनी ठेवणार नाही , अमेरिकेला पुन्हा महान बनवणार

 

  1. ‘सबका साथ सबका विकास

मोदी

‘सबका साथ सबका विकास चा नारा दिला . जाती धर्माच्या ऐवजी नेशन फर्स्ट ची घोषणा .

ट्रम्प

विजयानंतर बोलले रिपब्लिकन-डेमोक्रेट मध्ये सगळ्यांचा अध्यक्ष . सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार

You might also like
Comments
Loading...