टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. जगभरातील पर्यटक भारताकडे आकर्षित होत असतात. भारतामध्ये ऐतिहासिक भव्य राजवाडे, इमारती, किल्ले ,धार्मिक स्थळे आणि अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. सर्व प्रकारच्या लोकांच्या आवडीनुसार भारतामध्ये जागा आहेत. जर तुम्ही पर्यटक असाल आणि फिरण्यासाठी एखादी युनिक जागा शोधत असाल तर आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भारतातील काही सुंदर आणि रोमँटिक हाऊसबोट डेस्टिनेशन Houseboat Destination बद्दल माहिती सांगणार आहोत.
नक्की काय असते ही हाऊसबोट Houseboat
हाऊसबोट एका सामान्य बोटीसारखी बोट नसून ती घरासारखी डिझाईन केलेली असते. हाऊस बोट ही एका जागी स्थिर असते. हाऊसबोट मध्ये आपण अगदी घरातला फील घेऊन राहू शकतो. सध्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे जगात वेगवेगळ्या प्रकारच्या धावत्या हाऊसबोट देखील येऊ लागले आहेत.
भारतातील बेस्ट हाऊसबोट डेस्टिनेशन
श्रीनगर
जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये हाऊसबोट टुर करायचा प्लॅन करत असाल तर श्रीनगर हे त्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. उन्हाळ्याच्या दिवसात दाल सरोवर वरती हाऊसबोट चा अनुभव घेणे म्हणजे एखाद्या स्वर्गसुखाप्रमाणेच आहे.
केरळ
केरळ मधील कुठल्याही शहराचे नाव घेता सरळ राज्याचे नाव यासाठी घेतले आहे कारण केरळमध्ये अनेक ठिकाणी तुम्ही हाऊसबोटचा अनुभव घेऊ शकता. कारण बॅकवॉटर आणि हाऊसबोट म्हणलं तर त्या यादीमध्ये सर्वप्रथम केरळ राज्याचे नाव येते. केरळमध्ये असलेली केट्टा वल्लम ही हाऊसबोट सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर केरळमधील अलेप्पी, कुमारकोम आणि कोवलम ही शहरात देखील हाऊसबोट साठी प्रसिद्ध आहे.
कर्नाटक
कर्नाटकमध्ये वाहणारी स्वर्ण नदी हाऊसबोटीसाठी एक सर्वोत्तम पर्याय आहे. इथे तुम्हाला हाऊस बोटीबरोबरच संस्कृती, नारळाची शेती आणि इतर अनेक आकर्षक गोष्टी बघायला मिळतील. या ठिकाणी तुम्हाला महागड्या हॉटेलच्या भाड्यापेक्षा सुंदर आणि भव्य हाऊसबोट पर्याय उत्तम आहे.
आसाम
भारताच्या नॉर्थ-ईस्ट भागातले आसाम हे एक अतिशय सुंदर राज्य आहे. आसाम मधील चहाच्या बागा आणि निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आपल्याकडे ओढून घेते. त्याचवेळी आसाम मध्ये वाहणारी ब्रह्मपुत्रा नदी देखील सगळीकडे सुप्रसिद्ध आहे. इथे तुम्ही हाऊसबोट क्रूसचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही हाऊसबोट मध्ये मुक्काम करत नदी डॉल्फिन आणि स्थलांतरित पक्षीही बघू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- IND vs NED T20 World Cup | भुवनेश्वरने 12 चेंडूत 1 धावही दिली नाही! फलंदाज कोमात, केला नवा विक्रम
- Travel Guide | भारतातील ताजमहल सह ‘ही’ ठिकाणं आहेत परदेशी पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण
- IND vs NED । भारताचा नेदरलँड्सवर 56 धावांनी दणदणीत विजय
- Raosaheb Danave | “जरा आपल्या वयानुसार…”; रावसाहेब दानवेंचा आदित्य ठाकरेंवर हल्ला
- Ola Electric Bike | इलेक्ट्रिक स्कूटर आणि कारनंतर Ola लवकरच लाँच करणार आहे इलेक्ट्रिक बाईक