fbpx

शेवटची निवडणूक लढविणाऱ्या सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाची काय आहेत कारणे ?

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे डॉ. शिवाचार्य महास्वामी यांनी काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांचा सुमारे एक लाख चाळीस हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला आहे. काँग्रेसच्या या अपयशामागे बरीच कारणे आहेत. मात्र, त्यातील सर्वात महत्वाचे कारण काँग्रेसला मित्रपक्षांना सोबत घेण्यात आलेले अपयश. वंचित बहुजन आघाडीला (VBA) सोबत न घेतल्याने काँग्रेस आघाडीला मोठे नुकसान झाल्याचं चित्र आहे.

दरम्यान, ही माझी शेवटची निवडणूक आहे अशी घोषणा सुशीलकुमार शिंदे यांनी आधीच केली होती. त्यामुळे शेवटच्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदेना पुन्हा पराभवला सामोरं जावं लागलं. २०१४ च्या निवडणुकीत त्यांचा भाजप उमेदवार शरद बनसोडे यांनी पराभव केला होता.या निवडणुकीत जयसिद्धेश्वर स्वामी यांनी दीड लाखांपेक्षा जास्त फरकाने विजय मिळवला. ५० हजार मतांची मोजणी बाकी असतानाच जयसिद्धेश्वर स्वामी १ लाख ४७ हजार ७५६ मतांनी आघाडीवर होते. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना सोलापुरात तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.

सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाची काय आहेत कारणे ?

– गत निवडणुकीनंतर तुटलेला मतदारसंघाशी संपर्क़

– सोलापूर मनपा, जि़ प़ आणि ऩ प़ निवडणुकीत शिंदे यांनी अलिप्त राहण्याचे धोरण स्वीकारले़

– संघटनात्मक बांधणी करण्यात अपयश़ अनेक वर्षे तेच पदाधिकारी राहिले पदावऱ

– कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये जनसंपर्काचा अभाव. मतदारांचा कल ओळखण्यात आलेले अपयश.

– सर्वच तालुक्यात काँग्रेस अंतर्गत गटबाजी़ ही गटबाजी शमवण्याचा प्रयत्न झाला नाही़