खामगावात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी पालकमंत्र्यांनी दिले हे महत्वाचे निर्देश 

rajendra

 खामगाव : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय. या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी जिल्ह्यातील महसूल, कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले आहेत.

नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले, कृषी व महसूल यंत्रणेने गाव पातळीवरील आपली यंत्रणा सजग करावी. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकर्‍याच्या शेतीचा पंचनामा करावा.

एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटता कामा नये. त्याचप्रमाणे शेड नेट नुकसान, विहीर खचने, शेत खरडून जाणे, नाल्याचे पाणी शेतात घुसने आदी नुकसानीचासुद्धा पंचनामा करावा. पंचनामे पूर्ण करून शेतकर्‍यांना आर्थिक मदतीची कार्यवाही करावी. पीक विमा काढलेल्या शेतकर्‍यांनी जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात, कृषी सहाय्यकांना नुकसानीची माहिती द्यावी.

पीक विमा कंपनीने नुकसानभरपाई पात्र शेतकर्‍यांना देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी दिले आहे. विमा काढलेल्या शेतकर्‍यांनी तात्काळ नुकसानीची माहिती संबंधित कृषी विभाग व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना द्यावे, असे आवाहनही पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या :-