‘हे’ आहेत खाण्यासाठी लज्जतदार मासे

टीम महाराष्ट्र देशा : मासा हा पाण्यात रहणारा जलचर प्राणी आहे. मासा हे मानवाच्या दृष्टीने पौष्टिक अन्न आहे. यातील प्रथिने शरीराला पोषक आहेत. कॅल्शियम, फॉस्फरस व लोह यांसारखी जैव मूल्याच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी खनिजेही थोड्या प्रमाणात माशांपासून मिळतात. मासळीत काही महत्त्वाची जीवनसत्त्वेही असतात. कॉड, हॅलिबट, मुशी या माशांच्या यकृतापासून ‘अ’ व ‘ड’ जीवनसत्त्वयुक्त औषधी तेल निघते, तर आतड्यापासून ब जीवनसत्त्व मिळू शकते. मुश्यांच्या पक्षांपासून सार (सूप) करतात. मासे पचनास हलके असतात. त्यांच्या चरबीपासून रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉल वाढत नाही व आहारात त्यांचा समावेश केल्याने रक्तदाब कमी होतो. काही माशांच्या शरीरातील वाताशयांचा विविध कामांसाठी उपयोग केला जातो. पाळीव जनावरांच्या आहारासाठी मत्स्यपीठ व झाडांसाठी उत्तम खतही मासळीपासून मिळते. मत्स्योद्योगात जगातील कोट्यवधी लोक गुंतले आहेत. मासे आहारात असणे चांगले आहे.

आता पाहूया मासांचे प्रकार :

Loading...

कार्पस्-मासे हा भारतातील शेती-संवर्धनाचा मुख्य आधार आहे व तीन प्रकारचे भारतीय कार्प (कटला, रोहू, मृगळ) तसेच तीन प्रकारचे परदेशी मासे चंदेरी, गवती आणि सामान्य असे मिळून देशातील मत्स्यशेती उत्पादनाचा ८५% पेक्षा ही अधिक वाटा उचलतात. पावसात खाडीकिनाऱ्यावर शिंगाली माशांसारखे दिसणारे, मात्र त्यापेक्षा आकारने लहान असणारे तीन काटय़ांचे म्हणजेच चिवनी मासा म्हणतात. हा मासा तेलकट असल्यामुळे तो हातात धरताच सटकतो. त्याचा काटा टोचल्यास इजा होते. खाडीकिनारी हे मासे अंडी घालतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला हजारोंच्या संख्येने हे मासे किनाऱ्यावर येतात. शिंगळा शिंगटे किंवा शिंगाडा म्हणतात.

माशांच्या प्रकारांमधील पापलेट, रावस, सूरमई, बांगडा, सौंदाळे, हलवा, घोळ इ. मोठे आणि कमी काटे असलेले मासे. छोटय़ा आणि काटेरी माशांमध्ये करली, भिंगी, पाला (हे तिन्ही मोठे, पण भरपूर काटे असलेले मासे आहेत) तर मांदेली, मोदकं, बोंबील, कांटा, तारली, मुडदुसे, टोकेरी सुळे, बोयटं, पेडवे, निवटे(निवटी), शिंगाडा इत्यादी अनेक प्रकारचे मासे खाल्ले जातात. मोरी / मुशी (शार्कची जात) या माशाला काटे नसून केवळ मध्यभागी मणका असतो, हा पथ्याचा मासा म्हणून बिनधोकपणे खाल्ला जातो.

पापलेट, बांगडा, सुरमई, रावस, मोरी, हलवा यांची सर्वसाधारणपणे मोठय़ा माशांमध्ये गणना होते. तर सौंदाळे, मुडदुशी (नगली), बोंबील, मांदेली, वेरल्या, शेवटे, धोडय़ारे असे मासे छोटय़ा माशांमध्ये मोडतात. याशिवाय कुल्र्या, तिसऱ्या, खडपी कालवे, कोलंबी अशा प्रकारचे मासेही मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असतात. त्यापकी प्रत्येक माशाचे स्वत:चे गुणधर्म असतात. उदाहरण द्यायचे झाले तर खोल समुद्रात मिळणारे मोठे मासे (डीप सी फिश) हे सर्वसाधारणपणे अधिक बल देणारे अर्थात् बल्य असतात. उदा. रावस, हलवा, सुरमई. परंतु हे मासे पचायला जड असतात.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार