Share

Upcoming Car Launch | पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला लाँच होऊ शकतात ‘या’ धमाकेदार कार

Upcoming Car Launch | टीम महाराष्ट्र देशा: वाढत्या तंत्रज्ञानामुळे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहे. प्रत्येक ऑटोमोबाईल कंपनी आपल्या कंपनीचे बेस्ट मॉडेल बाजारामध्ये सादर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर पुढच्या महिन्यात आशियातील सर्वात मोठा ऑटोमोबाईल इव्हेंट ऑटो एक्सपो आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमांमध्ये अनेक ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या कंपनीचे बेस्ट मॉडेल लाँच करणार आहे. पुढच्या महिन्यात पुढील धमाकेदार कार लाँच होऊ शकतात.

महिंद्रा थार 4×2

महिंद्रा आपल्या महिंद्रा थारचे नवीन 4×2 मॉडेल लाँच करणार आहे. या नवीन मॉडेलमध्ये पेट्रोल आणि डिझेल हे इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये 117bhp, 1.5ल डिझेल आणि 2.0L पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. महिंद्राच्या या कारची किंमत सध्याच्या थार मॉडेलपेक्षा कमी असू शकते.

टाटा हॅरीयर स्पेशल एडिशन

टाटा मोटर्स लवकरच आपली मध्यम आकाराची एसयूव्ही हॅरीयरची स्पेशल एडिशन लाँच करणार आहे. या एसयूव्हीमध्ये फ्रंट ग्रिल आणि ब्रेक कॅलिपर्सवर स्पोर्टी रेड अॅक्सेंट आणि फ्रंट फेंडर्सवर स्पेशल एडिशन बॅजिंग मिळू शकते. या नवीन स्पेशल एडिशनमध्ये जुन्या मॉडेलचे इंजिन कायम ठेवण्यात आले आहे.

मारुती एस-प्रेसो एक्सट्रा एडिशन

मारुती लवकरच मारुती एस-प्रेसो एक्सट्रा एडिशन लाँच करणार आहे. या गाडीची किंमत कंपनी जानेवारी महिन्यामध्ये जाहीर करणार आहे. या कारमध्ये डोअर आणि व्हील आर्क क्लॅडिंग आणि पुढच्या बाजूला ‘एक्सट्रा’ बॅज मिळू शकतो. मारुतीच्या या नवीन एडिशनचे इंजिन जुन्या मॉडेलप्रमाणे ठेवण्यात आले आहे.

एमजी हेक्टर/हेक्टर प्लस फेसलिफ्ट

एमजी हेक्टर/हेक्टर प्लस फेसलिफ्ट त्या गाड्यांच्या किमती 5 जानेवारी 2023 रोजी घोषित केल्या जाणार आहे. या गाड्यांमध्ये सध्याच्या मॉडेलचे इंजिन पर्याय उपलब्ध असू शकतात. त्याचबरोबर यामध्ये हायब्रीड तंत्रज्ञान मिळू शकते. या गाड्यांमध्ये अनेक आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Upcoming Car Launch | टीम महाराष्ट्र देशा: वाढत्या तंत्रज्ञानामुळे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये दिवसेंदिवस बदल होत आहे. प्रत्येक ऑटोमोबाईल कंपनी आपल्या कंपनीचे …

पुढे वाचा

Cars And Bike

Join WhatsApp

Join Now