Share

Budget Car | 6 लाख रुपयांच्या रेंजमध्ये बाजारात उपलब्ध आहेत ‘या’ जबरदस्त कार

Budget Car | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये एसयूव्ही (SUV) कार (Car) आवडणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण महागड्या एसयूव्ही खरेदी करण्यासाठी अनेकांकडे बजेट नसते. अशा परिस्थितीमध्ये लोक परवडणाऱ्या एसयूव्ही कारचा पर्याय शोधत असतात. तुम्ही पण जर परवडणाऱ्या एसव्ही कारचा पर्याय शोधत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला बजेटमध्ये उपलब्ध असलेल्या एसयूव्ही कारच्या पर्यायाबाबत माहिती सांगणार आहोत. बाजारामध्ये पुढील एसयूव्ही कार 6 लाख रुपयांच्या किमतीमध्ये उपलब्ध आहेत.

टाटा पंच

टाटा पंच ही देशातील एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये या एसयूव्हीच्या 10,982 युनिटची विक्री झाली आहे. ही एसयूव्ही 1.2L पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. जे 86PS पॉवर आणि 113Nm टार्क निर्माण करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर या कारमध्ये ऑटोमॅटिक हेडलाइट्स, 7-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, ऑटो एअर कंडिशनिंग, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल इत्यादी फीचर्स उपलब्ध आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 6 लाख रुपये आहे.

रेनॉल्ट किगर

रेनॉल्ट किगर या कारमध्ये 1 लिटर पेट्रोल इंजन आणि 1 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे. या कारमध्ये पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डीआरएलसह एलईडी हेडलाइट्स, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, वायरलेस फोन चार्जर, 5 एअर फिल्टर, 7-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि क्रूझ कंट्रोल कधी वैशिष्ट्य उपलब्ध आहे. रेनॉल्ट किगर या कारची एक्स-शोरुम किंमत 5.99 रुपये आहे.

निसान मॅग्नाइट

निसान मॅग्नाइट या कारमध्ये 1 लिटर पेट्रोल आणि 1 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन अनुक्रमे 72PS पॉवर/96Nm टार्क आणि 100PS पॉवर/160Nm टार्क निर्माण करू शकतो. या कार मध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ट्रान्समिशन उपलब्ध आहे. या कारमध्ये 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, LED DRLs, LED हेडलॅम्प आणि ऑटो एसी, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले इत्यादी वैशिष्ट्य उपलब्ध आहेत. या काळजी एक्स-शोरूम किंमत 5.97 लाख रुपये आहे.

महत्वाच्या बातम्या

Budget Car | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये एसयूव्ही (SUV) कार (Car) आवडणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पण महागड्या …

पुढे वाचा

Cars And Bike

Join WhatsApp

Join Now