‘..त्यामुळे भाजप नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या विरोधात आंदोलन करावे’, पटोलेंचा खोचक सल्ला

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने देखील कोरोना स्थिती आटोक्यात असल्याने रखडलेल्या पोटनिवडणुका त्वरित घेतल्या जातील असे संकेत दिले होते.

यामुळे भाजपने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. भाजप आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज रस्त्यावर उतरणार आहे. एक हजार ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यानूसार आज विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकार आणि भाजपवर टीका केली आहे. ‘तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या. यामुळे फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

पटोले म्हणाले की, केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी दिली नाही. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या. यामुळे फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करावे’ असा खोचक सल्ला पटोले यांनी दिला आहे.

दरम्यान ओबीसींना आरक्षण न मिळण्यास भाजपच जबाबदार आहे, असा आरोप करतानाच केंद्र सरकारने तातडीने इम्पिरिकल डेटा द्यावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी नागपूर येथे मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. राज्य सरकारने मागास आयोग तयार करावा. त्या माध्यमातून इम्पेरिकल डेटा तयार करावा आणि पुन्हा कोर्टात यावे, असा सर्वोच्च न्यायालयानेच आदेश दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांच्याकडील डेटा आम्हाला द्यावा. तो कोर्टात दिल्यास ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल, असं नाना पटोले यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या